spot_img
ब्रेकिंगधक्कादायक! कॅब ड्रायव्हरचे महिसोबत भयंकर कृत्य...

धक्कादायक! कॅब ड्रायव्हरचे महिसोबत भयंकर कृत्य…

spot_img

पुणे । नगर सहयाद्री:-
पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याणीनगर परिसरात एका 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

२१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:३० वाजता, कल्याणीनगरमधील एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रवास करण्यासाठी कॅब बुक केली. संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी एक कॅब आली. गाडी चालवत असताना, आरोपी तरुण ड्रायव्हरने रियर व्ह्यू मिररमधून पीडितेकडे पाहून हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने महामार्गावर गाडी थांबवून थेट पोलिस स्टेशन गाठले.

रविवारी खडकी पोलिसांनी 20 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली. खडकी पोलिसांचे निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील असून, तो नुकताच मुंबईतून पिंपरी-चिंचवडला कामासाठी आला होता. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशात घटनेमुळे, पुण्यातील महिलांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता वाढली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

चार खासदार हनी ट्रॅपचा जाळ्यात! संजय राऊतांचा ट्विट बॉम्ब, वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यातील राजकारण पुन्हा एकदा हनी ट्रॅप प्रकरणामुळे ढवळून निघाले असून, शिवसेना...

थाटामाटात लग्न पार पडले अन् ‘नवरदेवा’वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह घडवून आणल्याप्रकरणी...

मुख्याध्यापकाकडे मागीतली पाच लाखांची खंडणीची; ‘या’ संस्थेच्या चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात एका शिक्षकाने शाळेच्या चेअरमन आणि स्वीकृत सदस्यावर...

209 बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटांतील ११ आरोपींची 19 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

मुंबई | नगर सह्याद्री:- मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर 2006 रोजी 11 मिनिटांत सात ठिकाणी झालेल्या...