Crime News : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. निरा नदीच्या पुलाखाली एका पोत्यात मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील सारोळा गावच्या हद्दीत निरा नदीवरील पुलाखाली नदी पात्रात पोत्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील पुरुष जातीचा हातपाय बांधून पोऱ्यात भरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरूवात केला आहे.मयूर निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नानाची वाडी नावाचे हॉटेलच्या कडेस निरा नदीच्या पात्रात एक अनोळखी पुरूष जातीच्या सुमारे 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला.
अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून गळा दाबून खून केला. त्यानतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे हात व पाय बांधून त्यास पांढरे पिवळे व लाल रंगाचे प्लॅस्टिकच्या पोत्यात घालून निरा नदी पात्रात फेकून दिले आहे, अशी नोंद पोलिसांत करण्यात आली आहे. सदरच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.