spot_img
अहमदनगरखळबळजनक! गर्भवती महिलेसह ५ वर्षाचा मुलांचा आढळला मृतदेह

खळबळजनक! गर्भवती महिलेसह ५ वर्षाचा मुलांचा आढळला मृतदेह

spot_img

राहुरी । नगर सहयाद्री:-
राहुरी तालुक्यातील गुहा येथील सहा महिन्याची गर्भवती असलेल्या विवाहितेसह ५ वर्षाचा मुलांचा शेततळ्यात आढळलेलया मृतदेहांचे शवविच्छेन न करता, हिंदू धर्माच्या रितीरिवाजपणे अत्यसंस्कार विधी न करता मृतदेहाची अप्रतिष्ठा केल्याप्रकरणी पती, सासू, सासरे व नातेवाईकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत संजय रामभाऊ बारहाते, रा. सडे, ता. कोपरगाव यांनी राहूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, दि. ७ जुलै रोजी रात्री फोन आला, त्यावेळी सांगितले की, माझ्या जावयाची बहीण ऋषाली हरिभाऊ कोळसे व मुलगा अंश हे गुहा येथील घराच्या पाठीमागील शेततळ्यामध्ये मयत अवस्थेत मिळुन आले आहे. ऋषाली व मुलगा अंश यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले नाहीत तसेच त्यांचे प्रेत घराचे बाहेर असून त्याच स्थीतीमध्ये ठेवुन मृतदेहावर हिंदु धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे कोणतेही विधी न करता त्यांच्या प्रेतांची अप्रतिष्ठा केली.

त्याच प्रमाणे त्यांच्या मरणाबाबत शासकीय विभागास कळविणे हे गरजेचे असतानाही ऋषाली हिचे सासरे, पती, सासु व इतर नातेवाईकांनी हेतुपरस्पर कळविले नाही, दोन्ही मृतदेहावर गुहा गावातील स्मशनभुमिमध्ये अंत्यसंस्कार केले आहेत. परस्पर अशी माहिती समजल्यानंतर संजय बारहाते यांनी सोमवार दि. १४ जुलै रोजी राहूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

असून या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात रवींद्र कोळसे, हरिभाऊ कोळसे, शारदा कोळसे रा. गुहा ता. राहुरी व इतर नातेवाईक यांच्यावर गु.र.न. ७८४ नुसार भारतीय न्याय संहिता ३०१, २११ प्रमाणे दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन न करता, मृतदेहाची अप्रतिष्ठा केली तसेच घटनेबाबत शासकीय यंत्रणेस कळविणे गरजेचे असताना हेतुपरस्पर माहीती न कळविता, परस्पर अत्यसंस्कार केले म्हणुन राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महापालिकेत कोणताही घोटाळा नाही; आयुक्तांचे स्पष्टीकरण, आमदार जगताप यांच्याबद्दल म्हणाले…

  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे स्पष्टीकरण अहिल्यानगर / नगर सह्याद्री - महानगरपालिकेत सुमारे ७७६...

महादेव मुंडे हत्या प्रकरण: न्याय मिळत नसल्याने पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

ज्ञानेश्वरी मुंडेने घेतले विष । बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल बीड | नगर सह्याद्री राज्यात संतोष देशमुख...

११ गावांसह २१ वाड्यांना मिळणार पाणी; मंत्री विखे पाटील यांची मोठी माहिती

संगमनेर | नगर सह्याद्री अकोले तालुयातील पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुयातील पठार भागातील जवळे बाळेश्वरसह...

मविआच्या आमदारांचं टॉवेल-बनियनवर आंदोलन

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. बुधवारी विरोधकांनी सत्ताधार्‍यांविरोधात आक्रमक पवित्रा...