spot_img
अहमदनगरखळबळजक! नगरमध्ये आढळले 'बांगलादेशी घुसखोर'; पोलिसांची मोठी कारवाई

खळबळजक! नगरमध्ये आढळले ‘बांगलादेशी घुसखोर’; पोलिसांची मोठी कारवाई

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि सैन्य कमांड मिलिट्री इंटेलिजन्स यांच्या संयुक्त कारवाईत तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. पोखर्डी गावातील वारुळे वस्ती येथील खडी क्रशरजवळील सिमेंट बांधकामाच्या खोलीतून एमआयडीसी पोलिसांनी आणि सैन्य कमांड मिलिट्री इंटेलिजन्सच्या सहकार्याने ही कारवाई केली. यात बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली.

एमआयडीसी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, पोखर्डी गावात काही बांगलादेशी नागरिक अवैधपणे राहत आहेत. यानंतर सपोनि माणिक बी. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी पोलीस आणि सैन्य कमांड मिलिट्री इंटेलिजन्स यांनी संयुक्त छापा टाकला. यात संशयित जहांगिर अवुताहेर शेख (वय ३४, रा. चट्टोग्राम, बांगलादेश), हनीफ अब्दुल खलीद शेख (वय ४०, रा. शेनबाग, बांगलादेश) आणि मुश्रफ हवीव शेख (वय ४०, रा. चट्टोग्राम, बांगलादेश) यांना ताब्यात घेतले.तपासात या तिघांकडे भारतात राहण्यासाठी कोणताही व्हिसा किंवा परवानगी नसल्याचे एमआयडीसी पोलिस आणि सैन्य कमांड मिलिट्री इंटेलिजन्सने उघड केले.

त्यांच्याकडील कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. एमआयडीसी पोलीस आणि सैन्य कमांड मिलिट्री इंटेलिजन्स यांच्या पथकात मनोज मोंढे, राकेश खेडकर, राजू सुद्रीक, किशोर जाधव, सुरज देशमुख, जयसिंग शिंदे, शेरकर, दहिफळे आणि मोबाइल सेलचे राहुल गुंडू यांचा समावेश होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धर्माच्या नावाखाली… ; घुलेवाडी येथील घटनेवर बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणाले?

संगमनेर / नगर सह्याद्री घुलेवाडी सप्ताह जे घडले ते तालुक्यातील जनतेने समजून घेतले पाहिजे....

दारू पिण्याची शर्यत बेतली जीवावर; एकाचा मृत्यू, नेमकं प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री - सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथे रविवारी (१७ ऑगस्ट) घडलेल्या...

नगरमध्ये देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांनी असा लावला सापळा

कृष्णा लॉजवर छापा | तिघांविरुद्ध गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरातील बुरुडगाव रोडवरील कृष्णा लॉजवर कोतवाली...

पारनेरमध्ये बिबट्याचा हैदोस, कुठे घडला प्रकार पहा

निघोज | नगर सह्याद्री बिबट्याचा निघोज, गुणोरे, गाडिलगाव, कुंड, खंडोबा पाऊतके परिसरात हैदोस सुरू असून...