spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: धक्कादायक! भर रस्त्यावर युवकावर हल्ला, कारण आलं समोर..

Ahmednagar Crime: धक्कादायक! भर रस्त्यावर युवकावर हल्ला, कारण आलं समोर..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
मागील भांडणाचा राग मनात धरून युवकावर कोयता व रॉडने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारी सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावरील सुखकर्ता कॉर्नरवर घडली. करण अशोक दाहिजे (वय २० रा. गावडे मळा, पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गन्हादाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: करण बुधवारी दुपारी भिस्तबाग येथून ड्रायक्लीनचे कपडे घेऊन दुचाकीवरून पाईपलाईन रस्त्याने जात असताना दुपारी एकच्या सुमारास सुखकर्ता कॉर्नरजवळ त्याना तीन दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी अडवले.

करण तनपुरे याच्या हातात कोयता, सातव व अर्जुन तनपुरे यांच्या हातात लोखंडी रॉड व दोन ते तीन अनोळखी व्यक्तींकडे लाकडी दांडके होते. त्यांनी करणला मारहाण करून जखमी केले. भांडण सुरू असताना रस्त्यावरील लोक जमा झाल्याने मारहाण करणारे घटनास्थळावरून पसार झाले.

नेमकं कारण काय?
दोन ते तीन दिवसांपूर्वी यश सातव याने दारू पिऊन सायंकाळी साडेआठच्या सुमारास करणला शिवीगाळ केली होती. यासंदर्भात करण यांनी यशच्या आई वडिलाला सांगितले असता त्याच्यावर पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली होती. मुलाबाबत सांगितल्याचा राग मनात धरून करणला मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सामान्यांचा आधारवड: आमदार अरुणकाका जगताप

अहिल्यानगर-  अरुणकाका आमदार अरुणकाका म्हणजे सामान्य जनतेचा आधारवड. गरिबांवरील अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा, गरीब आणि...

हवामान खात्याचा इशारा आला! नगर जिल्ह्याला ‘इतक्या’ दिवसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा अजूनही कायम असून, हवामान विभागाने पुढील...

निष्ठावंतांचं केडर जपणारे काका पुन्हा होणे नाही!

काका म्हणाले होते, ‌‘जनतेचे आशीर्वाद अन्‌‍ प्रेम मला मिळाले, सचिन आणि संग्रामला माझ्या दुप्पट...

भारतीय सैन्याने पाकिस्तानचा बुरखा फाडला; वाचा, स्पेशल रिपोर्ट

कर्नल सोफिया कुरेशी | पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी...