अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
निंबोडी गावातील बाऊची चौक येथे गुरुवारी (24 जुलै 2025) सायंकाळी 7 वाजता पाच जणांनी मिळून एका तरुणासह त्याच्या आई आणि बहिणीवर हल्ला करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी शुभम संदीप शिंदे (वय 17, मजुरी, रा. निंबोडी, अहिल्यानगर) यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन फिर्याद दाखल केली आहे.
शुभम यांनी सांगितले की, त्यांचा ओळखीचा आदित्य अनिल शिंदे याने वाद मिटवण्यासाठी त्यांना बाऊची चौकात बोलावले. तेथे करण नाना खैरे, ऋषीकेश कैलास जाधव, दिपक कचरू माळी, राज कचरू माळी आणि रोहन राजू जाधव (सर्व रा. निंबोडी) उपस्थित होते. दिपक माळीने शुभम यांना शिवीगाळ करत चापटीने तोंडावर मारले आणि खाली पाडले.
रोहन जाधवने पोटात लाथा घातल्या, तर राज माळीने पकडून ठेवले आणि ऋषीकेश जाधवने दगडाने पाठीवर हल्ला केला. शुभम यांच्या आरडाओरडाने त्यांची आई सुनिता संदीप शिंदे आणि बहीण शिवानी शिंदे सोडवण्यासाठी आल्या, तेव्हा करण खैरे याने त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. भिंगार कॅम्प पोलिसांनी बेकायदा जमाव, मारहाण आणि धमकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.