अहमदनगर | नगर सह्याद्री –
AHMEDNAGAR NEWS अल्पवयीन मुलीवर युवकाने वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीवर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून तिने दिलेल्या जबाबावरून युवकाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, पोसो, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओंकार दत्तात्रय राहिंज (वय २१ रा. केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ओंकार राहिंज याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर शहरातील एका उपनगरात राहते. ती एका शाळेत शिक्षण घेते. नोव्हेंबर २०२३ मध्ये तिची ओंकार सोबत ओळख झाली होती. त्यावेळी ओंकारने तिच्याकडे प्रेमाची मागणी केली असता त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. ५ नोव्हेंबरला ओंकारने त्याच्याकडील चारचाकी वाहनातून फिर्यादीला घेऊन गेला व वाहनातच तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी पुन्हा ओंकार याने उपनगरातील एका रूममध्ये पीडितेवर अत्याचार केेले. ५ जानेवारीला ओंकार याने पीडितेला मिरावली पहाड परिसरात नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर ओंकार पीडितेला कधीही भेटण्यासाठी आला नाही व त्याचा नंबर देखील पीडितेकडे नव्हता.
दरम्यान फेब्रुवारी महिन्यात पीडितेला त्रास सुरू झाल्याने तिच्या आईने ५ फेब्रुवारीला एका सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी केली असता पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले. तिला पुढील उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अमोल भारती करीत आहेत.
मुलीला पळविले
नगर शहरातील वाकोडी रस्त्यावर राहणार्या एका अल्पवयीन मुलीला (वय 15) पळवून अनल्याची घटना सोमवारी (दि. 5) सकाळी 11 ते दुपारी एकच्या दरम्यान घडली. मुलीचा शोध घेऊनही ती सापडली नसल्याने तिच्या आईने कोतवाली पोलिसात मंगळवारी (दि. 6) फिर्याद दिली. फिर्यादीवरून त्यांच्या श्रीगोंदा तालुययातील भाच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे पती सोमवारी सकाळी कामावर गेले होते. त्यावेळी त्यांची मुलगी घरीच होती. मुलीचे सराव पेपर सुरू असल्याने ती पेपरसाठी शाळेत जाणार होती. दुपारी एकच्या सुमारास फियादी यांना शाळेतील शिक्षकाने दोन करून मुलगी पेपरसाठी आली नसल्याची माहिती दिली. फिर्यादी यांनी पतीला मुलगी शाळेत गेली नसल्याचे कळविले. ते दोघे कामावरून घरी आले व त्यांनी मुलीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांच्या भाच्याचा मोबाईल बंद लागला. सुमारे दीड महिन्यापूर्वी भाच्याने मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यानेच मुलीला पळवून नेल्याची फायद पोलिसात देण्यात आली.