अकोले । नगर सहयाद्री-
येथील आदिवासी कुटुंबातील एका वर्षांच्या बाळाचे मंगळवारी रात्री झोळीतून अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी: अकोले येथील बेलापूर मध्ये ठाकर आदिवासी समाजातील शेतमजूर सुनील मेंगाळ हे पत्नीसमवेत राहतात. या दाम्पत्यास एक वर्षांचे बाळ आहे. आईने बाळास दूध पाजले व घरात बांधलेल्या झोळीत झोपी घातले.
आईवडील घरात झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने बाळाचे अपहरण केल्याचा प्रकार पहाटे उघडकीस आला.याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.