spot_img
अहमदनगरAhmednagar: धक्कादायक! डोक्याला 'हत्यार' लावत 'ट्रॅक्टर' पळवला, भर रस्त्यात 'भयंकर' प्रकार

Ahmednagar: धक्कादायक! डोक्याला ‘हत्यार’ लावत ‘ट्रॅक्टर’ पळवला, भर रस्त्यात ‘भयंकर’ प्रकार

spot_img

श्रीरामपूर। नगर सहयाद्री-
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर-टाकळीभान रोडवर एक धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे. अज्ञात तरुणांनी शस्राचा धाक दाखवत ‘ट्रॅक्टर’ पळवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी किशोर धिरडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावितर वृत्त: खोकर फाट्याजवळ ट्रॉलीचे चाक पंक्चर झाल्याने किशोर धिरडे दुसरा ट्रॅक्टर येत असल्यामुळे तेथे बसले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास काळ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून चार अज्ञात युवक त्याच्याकडे आले. त्यापैकी दोघांनी किशोर धिरडे यांना पकडले. त्यांच्या डोक्याला हत्यार लावून धिरडे यांना कारमध्ये बसवले. एकाने ट्रॅक्टर चालू केला. नंतर कारही चालू करुन ट्रॅक्टरला ओव्हरटेक करुन कार पुढे घेऊन आले.

दरम्यान त्यांनी तोंडावर कापड बांधलेले होते. आम्ही तुला मारणार नाही, असे म्हणत किशोर धिरडे यांना अशोकनगरफाटा मार्गे निपाणीवडगाव मार्गे १०.३० वाजता वडाळा फाटा मनाली गार्डन येथे आणून सोडले. सदर चोरटे गेल्यावर धिरडे यांनी त्यांच्या मावस भावाला बोलून घेतले. याप्रकरणी किशोर धिरडे यांचा फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...