spot_img
अहमदनगरधक्कादायक! विवाहितेवर अत्याचार करत 'तसले' व्हिडीओ पतीला पाठविले

धक्कादायक! विवाहितेवर अत्याचार करत ‘तसले’ व्हिडीओ पतीला पाठविले

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर शहरातून एक मानवतेला काळिमा फसवणारी घटना उघडकीस आली आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या विवाहित महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. धक्का दायक म्हणजे या अत्याचाराचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून पतीच्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवण्यात आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पीडिताने पोलिसांनी फिर्यादीने दिली आहे. या दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात संगमनेर तालुक्यातील तरुणाविरूध्द बुधवारी (१२ मार्च) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय निळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. श्रमिकनगर, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. अजय निळे याने जुलै २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात दुपारी १२ ते दोनच्या दरम्यान तसेच २८ जानेवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान पीडितेच्या राहत्या घरी अनधिकृतपणे प्रवेश करून झालेले लग्न मोडण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.

त्यानंतर अजयने पीडितेचे व्हॉट्सअॅप कॉल आणि व्हिडीओ रेकॉर्ड करून तिच्या पतीच्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पीडिताने १२ मार्च रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सदरचा प्रकार सांगितला. पोलिसांनी अजय निळे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस...

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...