spot_img
अहमदनगरधक्कादायक! मित्रानेच मित्राचा काटा काढला, कारण आलं समोर..

धक्कादायक! मित्रानेच मित्राचा काटा काढला, कारण आलं समोर..

spot_img

Maharashtra murder news: आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आला अन् मित्रानेच मित्राचा काटा काढला. मित्राचा खून करून मृतदेह शेतात पुरला. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावात ही धक्कादायक खुनाची घटना उघडकीस आली आहे. मित्राच्या चारित्र्यावर संशय घेऊन विकास मारुती गुरव याने आपला मित्र नेताजी तानाजी नामदे याचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याची खळबळजनक घटना समोर आली. ही घटना २४ ते २८ मे २०२५ दरम्यान घडली. मोहोळ पोलिसांनी आरोपी विकास गुरव याला अटक केली आहे.

नेताजी नामदे हा दळण आणण्यासाठी घराबाहेर गेला होता. मात्र, तो परत न आल्याने त्याचे वडील तानाजी नामदेव यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, नेताजीच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅप माहितीच्या आधारे तपासाला गती मिळाली. वडिलांनी व्यक्त केलेल्या संशयानुसार, पोलिसांनी विकास गुरव याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, विकासने नेताजीने त्याच्या आईसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या संशयातून खून केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासने नेताजीचा खून करून त्याचा मृतदेह शेतात पुरला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात विकास गुरव याला २ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना सौंदणे गावात आणि मोहोळ तालुक्यात चर्चेचा विषय बनली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांचा तपास सुरू असून, या प्रकरणातील इतर बारीकसारीक तपशील उघड होण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी या क्रूर कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...