spot_img
ब्रेकिंगमंत्री धनंजय मुंडे यांना धक्का; अजितदादांचा मोठा निर्णय..

मंत्री धनंजय मुंडे यांना धक्का; अजितदादांचा मोठा निर्णय..

spot_img

बीड । नगर सहयाद्री:-
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत आहे. असं असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकरणीच बरखास्त केलेली आहे.

बीड हा धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केज तालुका अध्यक्ष विष्णु चाटे यांचं नाव आलं होतं.

त्यांच्यावरती निळंबनाची कारवाईसुद्धा झाली होती. आणि आता बीड जिल्ह्यातील राष्ट्रावादी कॉंग्रेसची जिल्हा कार्यकारणी देखील रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे या घडामोडींमुळे धनंजय मुंडे यांना मात्र मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

वाल्मिक कराडवर मकोका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळाले. वाल्मिक कराडवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी प्रमुख हे आंदोलन करण्यात आले. आता वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. आज परत वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

वाल्मिक कराडच्या आईसह समर्थकांचे आंदोलन
दरम्यान वाल्मिक कराडवर राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी वाल्मिक कराडच्या आईसह समर्थकांनी परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी आज सकाळी पुन्हा समर्थकांनी आंदोलन सुरु केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमधील अपघातावर आमदार धस यांची प्रतिक्रिया; मुलाला व्यसन नाही, तो….

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या कारने सोमवारी...

माजी नगरसेवक अमोल येवलेसह 12 जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- केडगाव येथील 132 केव्ही महावितरण उपकेंद्रात शासकीय कामकाजादरम्यान अतिरिक्त कार्यकारी अभियंता...

मुख्यालयातील पोलीस अंमलदार झाले बेपत्ता

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत....

नगरमधील तीन युवकांचा मृत्यू; तिरुपतीवरुन परत येतांना नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री :- अहिल्यानगर जिल्हयातील शेवगाव येथील युवकांच्या अपघताचे वृत्त समोर आले...