Today News: राजकीय वर्तुळातून अलीकडच्या काळात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना, आता एक दुःखद बातमी आली आहे. आसामचे माजी गृहमंत्री आणि आसाम आंदोलनाचे प्रमुख नेते, दिवंगत भृगू कुमार फुकनयांच्या २८ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घराच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. उपासा फुकन असे या तरुणीचे नाव असून, या घटनेने गुवाहाटी शहरात खळबळ उडाली आहे.
सदरची घटना रविवारी पहाटे, सुमारे ७ वाजून ५५ मिनिटांनी, गुवाहाटीच्या घारगुल्ली परिसरातील उपासा फुकन यांच्या निवासस्थानी घडली. उपासा आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचे आढळून आले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुरुवातीला, हा केवळ एक अपघात असावा, असे मानले जात होते. मात्र, प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी त्यांनी स्वतःहून उडी मारून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला आहे.
उपासा फुकन या माजी गृहमंत्री दिवंगत भृगू कुमार फुकन यांच्या एकुलत्या एक कन्या होत्या. वडिलांच्या निधनानंतर त्या आपल्या आईसोबत घारगुल्ली येथील घरात राहत होत्या. एका माजी मंत्र्याच्या आणि प्रतिष्ठित नेत्याच्या मुलीने अशा प्रकारे आपले जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे.