मुंबई । नगर सहयाद्री:-
निवडणुकीनंतर सर्व महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा केले जातील, असे सांगण्यात आले होते. मात्र निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तीन महिने उलटले आहेत. तरी अद्याप लाडकी बहीण योजनेचा २१०० रुपये हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यातच आता लाडक्या बहिणींना सरकारने एक मोठा धक्का दिला आहे. राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होणार नाही अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा २१०० रुपये करणार, असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते. राज्यातील महिलांना याबद्दलचे वचन देण्यात आले होते. मात्र अद्याप या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता महिलांना मिळालेला नाही.
सध्या महिलांना १५०० रुपये हफ्ता दिला जात आहे. यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४६००० हजार कोटींची तरतूद केली होती. सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचा वाढीव हफ्ता देण्यात येणार नाही.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांना अपात्र करण्यात आल आहे. तसेच सध्या लाडकी बहीण योजनेत विविध निकष लावण्यात आले आहे. त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी निकष लावल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून ही योजना रद्द होईल, अशी चर्चाही रंगली होती.