spot_img
ब्रेकिंग५० लाख लाडक्या बहि‍णींना लाभ होणार बंद!, उजेडात आलं कारण..

५० लाख लाडक्या बहि‍णींना लाभ होणार बंद!, उजेडात आलं कारण..

spot_img

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट समोर आली आहे. आता ५० लाख लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. लाडक्या बहि‍णींच्या अर्जांची पडताळणी सरकारकडून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये ५० लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे.

राज्यातील तब्बल अडीच कोटींहून जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. त्यातील अनेक महिलांनी नियमांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यात ५० लाख महिलांचे उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे.

यातील उत्पन्नाची पडताळणी आता केली जाणार आहे. २.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेतून बाद केले जाणार आहे. यासाठी आयकर विभागाकडून माहिती मागवण्यात आली आहे. आयकर विभाग लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती महिला व बालकल्याण विकास विभागाला देणार आहे. त्यानंतर यातील जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये.

मे महिना संपला तरीही महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांना अनेक प्रश्न पडले आहेत. त्यानंतर आता मे आणि जूनचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे पैसे कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु जून महिन्यात महिलांच्या खात्यात नक्की पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये ३००० रुपये कदाचित एकत्र येतील किंवा दोन्ही हप्ते वेगवेगळे येतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढील चोवीस तासांत ठेवीदारांचे पैसे द्या, आम्ही पाठिंबा द्यायला तयार!

गोरेश्वर सहकार बचाव पॅनलचे प्रमुख बाबासाहेब तांबे यांचा विरोधकांवर हल्लाबोल पारनेर | नगर सह्याद्री पतसंस्था...

जीममध्ये भयंकर घटना! तरुणाला फरशीवर आपटले, कारण काय?

जामखेड । नगर सहयाद्री:- जीममध्ये तु उशिरा का आलास असे म्हणत एकास जीममध्येच उचलुन...

‘जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची हिवरेबाजारला भेट’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिवरेबाजार येथे गुरुवार 05 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ‌‘एक...

पारनेरकरांना खुशखबर! आमदार दाते यांच्या पाठपुराव्याला यश; या कामांसाठी 20 कोटी…

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ धरणाच्या डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण...