पारनेर । नगर सह्यादी:-
आबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून आमदारकी रद्द करण्याची व आमदार महेश लांडगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची प्रमुख मागणी शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. शिवबा संघटनेच्या वतीने मुंबई येथे विधान भवन समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. मागणीचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देत आबू आझमी यांची आमदारकी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, तसेच देशद्रोहाचा खटला दाखल करावा. हिंदुत्ववादी भूमिका मांडणाऱ्या आमदार महेश दादा लांडगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे, जिल्हाध्यक्ष माऊली घोडे, तालुका प्रमुख सोमनाथ भाकरे, राजूभाऊ लाळगे, ओंकार जाधव नवनाथ बरशिले, कृष्णा मैड, केशव शिंदे, दत्ता टोणगे, शांताराम पाडळे, हरीश मधगे, निलेश वरखडे, योगेश भाकरे, रोहित कदम, राहुल गारुडकर, धनंजय पांढरकर, प्रशांत घोडे, महेश साळुंके, कृष्णा तौर, शशिकांत काळे, शिवाजी साळुंके आदींसह शिवबा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
औरंगजेबाचे उदात्तीकरण भोवले
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी औरंगजेबाचा वाद धार्मिक नव्हता तर राजकीय वैमनस्यातून त्यांची हत्या झाल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनीही तीव्र आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यानतंर आमदार अबू आझमी यांचे बुधवारी अधिवेशनकाळापर्यंत निलंबन करण्यात आले आहे.