spot_img
अहमदनगरदोन दिवसानंतर सापडला शिवा ठाकरेचा मृतदेह!, रांजणखळगे कुंड परिसरात नेमकं काय घडलं?

दोन दिवसानंतर सापडला शिवा ठाकरेचा मृतदेह!, रांजणखळगे कुंड परिसरात नेमकं काय घडलं?

spot_img

निघोज | नगर सह्याद्री
जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड परिसरात फिरण्यासाठी आलेल्या शिवा दादाभाऊ ठाकरे (वय 28, रा. राहाडी, ता. येवला, जि. नाशिक) यांचा खडकावरून पाय घसरून कुंडातील पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (दि. 12) दुपारी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह कुंडात तरंगताना आढळून आला. नाशिक जिल्ह्यातील राहाडी ता. येवला येथील ठाकरे कुटुंब मळगंगा देवीचे दर्शन घेऊन रांजणखळगे परिसरात फिरण्यासाठी आले होते.

यावेळी काही सदस्य कुंडात आंघोळीसाठी उतरले, तर शिवा ठाकरे खडकावर बसले होते. नंतर ते रांजणखळगे पाहण्यासाठी जवळ गेले असता, खडकावर शेवाळ्यामुळे घसरून ते कुंडात पडले आणि वाहून गेले. मात्र त्यांच्या बरोबर आलेल्या नातेवाईकांच्या सदरची बाब लक्षात आली नाही. चार ते पाच जणांच्या आंघोळीनंतर त्यांना वाटले की शिवा ईतर नातेवाईकांबरोबर गेला आहे.

जेव्हा सर्व नातेवाईक एकत्र आल्यावर शिवा ठाकरे आपल्या सोबत नाही हे सर्वांच्या लक्षात आले. यावेळी कटुंबीयांनी शिवा दुसऱ्या गाडीत बसून गेल्याची शक्यता वर्तवली. मात्र गावी गेल्यानंतर शिवा ठाकरे परतलेच नसल्याची खात्री झाली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी कुंडावर येऊन शोध सुरू केला. शिवा ठाकरे हे कुंडात पडले व वाहून गेले हे या नातेवाईकांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

त्यांचे भाऊ शंकर ठाकरे यांनी निघोज पोलीस ठाण्यात शिवा ठाकरे बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर हेडकॉन्स्टेबल एस एन कडूस, तोरडमल व गुजर यांनी शोध सुरू केला. गुरुवार दि. 12 रोजी कुंड परिसरात दुपारी चार वाजता शिवा ठाकरे यांचा मृतदेह तरंगताना आढळला.

याची माहिती टाकळी हाजीचे मा. सरपंच दामूशेठ घोडे यांनी पोलिसांना दिली. निघोज पोलीसांनी घटनस्थळी धाव घेत मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिशय खोल जागेत व पुर्णपणे अडचणीत असल्याने मृतदेह काढता आला नाही. शुक्रवार दि. 13 रोजी शिवदुर्ग मित्र सुनिल गायकवाड यांच्या मदतीने आधुनिक पद्धतीने शिवा ठाकरे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतल्याबद्दल टाकळी हाजी व निघोज येथील दोन्ही गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी पोलिस निरीक्षक समीर बारवकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रकार! एका कारणामुळं शिक्षिकेची पदोन्नती रद्द; नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका महिला...

पारनेर तालुक्यात पिकांचा बनावट पंचनामा; सखोल चौकशीची मागणी

पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पिंपरी...

राज-उद्धव ठाकरेंच्या युतीचं अखेर ठरलं, जागावाटपाबाबत मोठी माहिती समोर!

मुंबई / नगर सह्याद्री : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मनसेचे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात...

सरपंच संजय रोकडे यांची आक्रमक भूमिका; ग्रामस्थांसह ‘या’ कामांसाठी करणार उपोषण..

पारनेर । नगर सहयाद्री:- वडगाव सावताळ ते गाजदिपूर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी...