spot_img
अहमदनगरबदनाम करण्यासाठी 'त्यांची' दुकानदारी, भ्रष्टाचार काळात शिवसेनेची सत्ता; आ. जगताप यांनी विरोधकांचा...

बदनाम करण्यासाठी ‘त्यांची’ दुकानदारी, भ्रष्टाचार काळात शिवसेनेची सत्ता; आ. जगताप यांनी विरोधकांचा घेतला समाचार

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे स्वयंघोषित नेते खा. संजय राऊत यांना आताही कोठूनच प्रसिद्धी मिळत नसल्याने ते स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी सतत वादग्रस्त विधान करतात. भ्रष्टाचाराने ज्यांचे हात बरबटलेले आहेत असे खा.राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपात ईडीचा प्रसाद घेत अनेक महिने जेलमध्ये काढले आहेत. ते स्वतः भ्रष्टाचारी असल्याने सर्वजण त्यांना भ्रष्टाचारीच दिसत आहेत. त्यांना माहिती देणारे अनेकदा तोंडघशी पडले आहेत. खोट्या आरोपांनी जनतेची दिशाभूल करत शहरात सुरु असलेली विकासकामे त्यांना थांबवायची आहेत.

पण त्यांच्या अशा खोट्या आरोपांना भिक न घालता अहिल्यानगर मधील एकही काम न थांबवता विकास कामे चालू ठेवणार आहे. विकासकामांमध्ये जर कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना जशासतसे उत्तर दिले जाईल, अशा शब्दात अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी सडेतोड प्रत्युत्तराने विरोधकांचा समाचार घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत अहिल्यानगरमध्ये महानगरपालिकेने 300 ते 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाला आ.संग्राम जगताप यांनी मुंबईतून प्रत्युत्तर देत खा. राऊत व विरोधकांचा समाचार घेतला.

आ. संग्राम जगताप म्हणाले, आमच्या माता भगिनींसाठी रोज टीव्हीवरील मनोरंजनात्क सिरीयल असतात तसे खा.राऊत यांचे रोज सकळाचे वक्तव्य व आरोप हे सर्वांसाठी मनोरंजनाचे साधन असल्याने त्यांना फार कोणी गांभीर्याने घेत नाही. सत्तेत असताना त्यांना कोणताच विकास करता आला नाही व आताही कोठूनच प्रसिद्धी मिळत नसल्याने ते आमच्या सारख्या काम करणाऱ्यांवर असे खोटे आरोप करत प्रसिद्धीच्या झोतात येत आहेत.

अहिल्यानगरला बदनाम करण्यासाठी ब्लॅकमेलर लोकांची दुकानदारी
अहिल्यानगर बदनाम करण्यासाठी शहरातील काही ब्लॅकमेलर लोकं त्यांना अशा स्वरुपाची खोटी माहिती देत आपली दुकानदारी चालू ठेवत असतात. अशांच्या ब्लॅकमेलिंग मुळे अहिल्यानगरमध्ये काहींनी आत्महत्याही केल्या आहेत. अशा ब्लॅकमेलरांच्या आरोपांकडे नगरकर कायमच दुर्लक्ष करत असल्याने ते अनेकदा तोंडघशी पडले आहेत. असा विरोधकांचा खरपूस समाचार आमदार संग्राम जगताप यांनी घेतला.

भ्रष्टाचार काळात शिवसेनेची सत्ता
अहिल्यानगर महानगरपालिकेत 300 ते 400 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा साक्षात्कार खा.राऊत यांना झाला आहे. मात्र त्यांनी ज्या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्याकाळात शिवसेनेचीच सत्ता होती व महापौर व नगरसेवक सत्ता भोगत होते. मग त्यावेळी हा भ्रष्टाचार तुम्हाला दिसला नाही का? जर एवढा मोठा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असता तर एकही सिमेंटची गोणी रस्त्यावर पडली नाही, असा याचा अर्थ होतो. मात्र आज शहरातील रस्त्यांची कामे व दर्जा काय आहे हे नगरकर अनुभवताहेत. अहिल्यानगरची जनता फार सुज्ञ व चाणाक्ष आहेत त्यांना सर्व राजकीय आरोप समजतात. म्हणूनच जनतेने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दोनदा महापौर व तीनदा आमदार होण्याची संधी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरसेवकाची आरोग्य अधिकाऱ्यास दमबाजी; मनपा कर्मचाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले असून संबंधितांवर कारवाई करावी - सचिव...

कामात अडथळा, जीव मारणे प्रकरणी नगरसेवक कोतकर, बोराटेंवर एफआयआर, काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबूराव राजुरकर यांच्या तक्रारीवरून नगरसेवक...

आमदार माजलेत….; विधानसभेत फडणवीस संतापले, काय घडलं जाणून घ्या

मुंबई / नगर सह्याद्री - विधानभवनात गुरुवारी झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण विधिमंडळाच्या प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं...

विधिमंडळ वादाचा आखाडा?; मध्यरात्री मोठा राडा!, काय काय घडलं?

मुंबई । नगर सहयाद्री:- गुरुवारी 17 जुलै विधिमंडळाच्या लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार...