पुणे । नगर सहयाद्री:-
राज्यात शिवसेना शिंदे पक्षाच्या ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा आहे. नुकताच शिवसेना उबाठाचे अत्यंत विश्वासू मानल्या जाणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. त्यातच दोन दिवसांत पुण्यातील काही बडे नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे.
ऑपरेशन टायगर हे पत्रकारांनी नाव दिले आहे. मात्र महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार हा खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. त्यावरच विश्वास ठेवून ठाकरे गटातील अनेक नेते हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. ते देखील कोणत्याही ऑपरेशनशिवाय, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वत्र त्यांच्यावर टीका केली जात आहे. ज्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहीत नाही, ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, महाराष्ट्रातील महापुरुषांचे कार्य त्यांना माहीत नाही, अशांना आम्ही इतिहास शिकवावा ही दुर्देवाची गोष्ट आहे, असा निशाणा उदय सामत यांनी राहुल गांधी यांच्यावर साधला आहे.