spot_img
ब्रेकिंगशिवसेना-मनसे युती पुन्हा चर्चेत; उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल, राज ठाकरे म्हणाले...

शिवसेना-मनसे युती पुन्हा चर्चेत; उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल, राज ठाकरे म्हणाले…

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती संदर्भातल्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन पक्ष एकत्र येणार का? हा प्रश्न राजकीय चर्चेत आहे. त्यातच, आदित्य ठाकरे यांनी मागील 2 आठवड्याभरापासून मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीला हिरवा कंदील पण दुसरीकडे मनसेकडून युती संदर्भात बोलायला मौन बाळगल्याचा पाहायला मिळालं. खरंच दोन महिन्यापासून माध्यमांमध्ये होणाऱ्या या चर्चा आणि प्रतिक्रिया पुढे जाणार आहेत का? नेमकं या दोन पक्षात काय सुरू आहे? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, गेल्या काही दिवसांत मनोमिलनाच्या होणाऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र हितासाठी आपण कोणत्याही पक्ष सोबत एकत्र येण्यासाठी तयार आहोत आम्ही साद दिली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आणि पुन्हा एकदा मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीची चर्चा सुरू झाली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एप्रिल महिन्यात दिलेल्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मनसे सोबत युती करण्याची तयारी दर्शवली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक महत्त्वाचे नेत्यांनी आपण मनसेसोबत युती करण्यास पूर्णपणे सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं. युती करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली असून ते सुद्धा युती संदर्भात पुढे पाऊल टाकण्यास तयार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. मात्र, मनसेकडून अद्यापही याला कुठल्याही प्रकारे प्रतिसाद मिळालेला नाही. युतीच्या चर्चेला राज ठाकरेंच्या मुलाखतीतून सुरुवात झाली त्याचा अर्थ प्रत्येकाने वेगळा घेतला असल्याचं राज ठाकरेंनी मुलाखतीतच स्पष्ट केलं आहे.

याशिवाय, मनसे नेत्यांकडून सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारे सकारात्मक प्रतिक्रिया न देता मनसे अध्यक्ष राज ठाकरे योग्य भूमिका योग्यवेळी घेतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिळालेल्या युती संदर्भातील सकारात्मक प्रतिक्रियेला मनसेकडून साद मिळणार का? राज ठाकरे युती संदर्भातील चर्चेला ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोर लावला जात असताना तयार होणार का? प्रत्यक्षात या चर्चेसाठी पुढाकार कोणी घेणार का? पडद्यामागे काही हालचाली सुरू आहेत का? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.

शिवसेना नेत्यांकडूनही ग्रीन सिग्नल
नेमकं मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात खरंच पडद्यामागे काही सुरू आहे का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलाखतीत युती संदर्भात साथ दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिला. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना हे दोन पक्ष एकत्र यावे ही जनभावना असल्याचे समजून ठाकरेंच्या शिवसेनेतील काही नेत्यांनी सुद्धा यासंबंधी सकारात्मक प्रतिसाद दाखवत उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना आपण सद्यस्थितीत मनसेसोबत जाण्यासाठी सकारात्मक आहोत आणि ते पाऊल उचलायला आपल्याला काहीच हरकत नाही असं सांगितलं. पक्षप्रमुखांसोबत झालेल्या चर्चेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मनसेसोबत जाण्याच्या चर्चेला माध्यमांमध्ये सुद्धा सकारात्मक प्रतिसाद प्रतिक्रियांमधून दिल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल परब अंबादास दानवे सुनील प्रभू सुषमा अंधारे या सर्व नेत्यांनी माध्यमांमध्ये येऊन मनसे सोबत युतीसाठी तयारी दर्शवली

चर्चेत कोण मध्यस्थी करणार
ठाकरेंची शिवसेना आता या सगळ्यांमध्ये वाट पाहत आहे, ती मनसेच्या भूमिकेची. मनसे युती करण्यासंदर्भात तेवढीच सकारात्मक आहे का? उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात काही अटी यामध्ये ठेवल्या आहेत. ज्यामध्ये महायुती सोबतचे संबंध मनसेने सोडून ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करावी. महायुती सोबतचे मनसेची जवळीक आणि त्यांचे संबंध पाहता महायुतीतील पक्षासोबतचे संबंध बाजूला ठेवून मनसे ठाकरेंच्या शिवसेने सोबत येणार का? हे पाहावे लागणार आहे. मात्र, राज ठाकरे यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या सकारात्मक प्रतिसादाला अजून कुठलेही उत्तर किंवा प्रति टाळी मिळालेली नाही. मनसे नेत्यांनी सुद्धा राज ठाकरे जो निर्णय घेतील त्यासोबत जाणार असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे खरंच जर युती होणार असेल तर दोन पक्षांमध्ये मध्यस्थी कोणी नेता करणार की दोन भाऊ एकत्रित चर्चा करणार? की फक्त या युतीच्या चर्चा माध्यमांच्या चर्चा राहणार? हे लवकरच कळणार आहे

मनसेला अटी मान्य होतील का?
दरम्यान, एका टाळीला परत प्रति टाळी मनसेकडून कधी मिळणार याची प्रतीक्षा हे दोन पक्ष एकत्र येण्याची इच्छा व्यक्त करणारे कार्यकर्ते पाहत असतील. कारण, ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत युती करायला सकारात्मक जरी असली तरी मनसेला घालून दिलेल्या अटी आणि युती करण्यासंदर्भात मनसेची इच्छा आणि पुढील मनसेची भूमिका यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असल्याचे दिसत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढील चोवीस तासांत ठेवीदारांचे पैसे द्या, आम्ही पाठिंबा द्यायला तयार!

गोरेश्वर सहकार बचाव पॅनलचे प्रमुख बाबासाहेब तांबे यांचा विरोधकांवर हल्लाबोल पारनेर | नगर सह्याद्री पतसंस्था...

जीममध्ये भयंकर घटना! तरुणाला फरशीवर आपटले, कारण काय?

जामखेड । नगर सहयाद्री:- जीममध्ये तु उशिरा का आलास असे म्हणत एकास जीममध्येच उचलुन...

‘जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची हिवरेबाजारला भेट’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिवरेबाजार येथे गुरुवार 05 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ‌‘एक...

पारनेरकरांना खुशखबर! आमदार दाते यांच्या पाठपुराव्याला यश; या कामांसाठी 20 कोटी…

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ धरणाच्या डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण...