अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अतिरेक्यांचा हेतू एकच असतो, देशात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे आणि शांती बिघडवणे. अशा लोकांशी संवाद साधणे, त्यांना समजावणे, हे उपाय अनेकदा अपयशी ठरले आहेत. जेव्हा संवाद आणि कायदेशीर प्रक्रिया अयशस्वी होतात तेव्हा कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात, असे कठोर निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे घेतीलच पण निष्पाप पर्यटकांची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांना घरात घुसून गोळ्या घातल्या पाहिजे. जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ला हा फक्त हिंदूस्थानातील हिंदूसाठी होता. अशा अतिरेक्यांना आणि त्यांना साथ देणाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यात यावे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी केले.
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्याचा शहर शिवसेनेच्यावतीने दिल्लीगेट येथे निषेध व्यक्त करुन निदर्शने करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, रामदास भोर, दत्ता कावरे, परेश लोखंडे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, सुरेश क्षिरसागर, ओंकार शिंदे, अरुण झेंडे, गौरव ढोणे, कैलास शिंदे, आण्णा घोलप, अभिजित अष्टेकर, रणजित परदेशी, संजय आव्हाड, अविनाश भिंगारदिवे, अक्षय भिंगारे आदी उपस्थित होते.
यावेळी संभाजी कदम म्हणाले की, पहलगाम येथील हल्याचा निषेध म्हणून दिल्लीगेट येथे निदर्शने केले. पहलगाम येथील भ्याड हल्ला हा फक्त हिंदुस्थानातील हिंदूंसाठी होता जर हिंदूंवर असे भ्याड हल्ले होत असतील आता हिंदूही गप्प बसणार नाही. अतिरेक्यांना पकडून त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे असे कदम म्हणाले.
दिलीप सातपुते म्हणाले की, अतिरेकी धर्म विचारुन गोळ्या घालत होते. यामध्ये हिंदस्थानातील अनेक हिंदू मारले गेले. या भ्याड हल्लाचा शहर शिवसेनाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करुन त्या अतिरेक्यांना मारले पाहिजे, हिच खरी श्रद्धांजली ठरेल या हल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना, असे ते म्हणाले.यावेळी बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, शाम नळकांडे, गौरव ढोणे आदींनी या हल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.