spot_img
ब्रेकिंग‘कोहिनूर’ हरपला; मनोहर जोशी यांचे निधन

‘कोहिनूर’ हरपला; मनोहर जोशी यांचे निधन

spot_img

मुंबई। सहयाद्री-
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (वय ८६) यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी पहाटे (दि. २३) तीनच्या सुमारास निधन झाले. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील ‘कोहिनूर’ हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधुकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑटोबर ९९ ते मे २००२ केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुख्यमंत्री असतांना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी जोशी यांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हा तात्काळ आदेश मानत जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ही नाट्यमय घटना त्यानंतर अनेक महिने चर्चेचा विषय ठरली होती.

ऑटोबर २०१३ च्या शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. नोव्हेंबर २०१२ ला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन, त्यानंतर त्यांच्या स्मारकाचा विषय, त्यावर केलेली टिप्पणी यामुळे मनोहर जोशी यांना शिवसैनिकांनी लक्ष्य केले होते.

उद्धव ठाकरे यांचे नियोजित दौरे रद्द
मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर होते. मनोहर जोशींच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला. ते मुंबईकडे रवाना होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डीवायएसपी बनून प्लॉटच्या नावावर रेल्वे पोलिसांना घातला मोठा गंडा; काय घडलं पहा

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी नुकसानीचे अनुदान खात्यावर वर्ग

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अतिवृष्टी आणि पूर यामुळे दिनांक ०१ जून ते सप्टेंबर २०२५ या...

मनपाची मनमानी थांबवा, त्यावर नागरिकांचा संताप, खासदार लंके म्हणाले…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेतील अनियमितता, अस्पष्टता आणि नियमभंगाविरोधात...

मालमत्ताकरात मनपाकडून मोठे स्टेटमेंट; आयुक्त डांगे म्हणाले…

मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत कराच्या नाहीत / कर निर्धारित करण्यासाठी...