spot_img
अहमदनगरशिर्डीत आता एलसीबी! 'नगरसेवक का असेना त्याला सोडणार नाही'; सुजय विखे नेमकं...

शिर्डीत आता एलसीबी! ‘नगरसेवक का असेना त्याला सोडणार नाही’; सुजय विखे नेमकं काय म्हणाले?

spot_img

शिर्डी । नगर सहयाद्री:-
शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न उपस्थित केला होता त्यावर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. शिर्डी शहरात जिल्हा पोलीस प्रमुखांनी आठ लोकांचं स्वतंत्र पथक तयार केलं आहे. हे पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या नियंत्रणात काम करणार आहे. शिर्डीत राहणार्‍या नागरिकांचे आधार, रेशन कार्ड याची चौकशी करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून टेंडर काढले जाणार आहे. गुन्हेगाराच्या फ्लेक्स बोर्डवर कोणीही फोटो लावल्यास त्याच्यावर देखील कारवाई होणार. मग तो नगरसेवक का असेना त्याला सोडणार नाही. हे. शिर्डी ग्रामस्थ जे म्हणतील त्यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम असल्याची माहिती माजी खा.डॉ सुजय विखे यांनी शिर्डीत दिली.

शिर्डीत बुधवारी सायंकाळी शिर्डी ग्रामस्थांनी शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी डॉ. सुजय विखे बोलत होते. सुजय विखे म्हणाले, रात्री अकरा वाजता साईबाबांची आरती संपल्यानंतर शिर्डी पूर्णपणे बंद राहील याची पुढील चार दिवस शहरातून दवंडी देण्यात येणार आहे. रात्री साडेअकरा वाजता शिर्डी शहरात कोणीही व्यक्ती रस्त्यावर चालताना दिसला तर त्याला विचारणा करूनच अटक करण्यात येईल. त्या व्यक्तीला दवाखाना किंवा अत्यावश्यक ठिकाणी जाण्याचा पुरावा द्यावा लागेल. हे करणे काळाची गरज आहे. कोणीही व्यक्ती कारण नसताना रात्री उशिरा रस्त्यावर फिरते. असे अनेक निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आले आहे. याचा परिणाम पुढील दहा दिवसांत आपल्याला शिर्डी शहरात पहावयास मिळणार आहे.

पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. रात्री साडेअकरा वाजता हॉटेल बंदचा निर्णय हा ग्रामसभेत झाला आहे.शिर्डीच्या सुरक्षेची जबाबदारी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची आहे. मी प्रसादालयाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल स्थानिकांनी माझ्या विरोधात एकही शब्द काढला नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणतो महाराष्ट्र माझ्याबद्दल काय विचार करतो, यापेक्षा मी ज्या लोकांच्या जीवावर आज एवढा मोठा झालो ते लोक माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. पालखी मधून येणार्‍या साईभक्तांनाच त्या सुविधा द्याव्यात, बाहेरच्या लोकांना देऊ नये. शिर्डीत राहणार्‍या नागरिकांचे आधार, रेशन कार्ड याची चौकशी करण्यासाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून टेंडर काढले जाणार आहे.

शिर्डी ग्रामस्थ जे म्हणतील त्यासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी ग्रामस्थांच्या पाठीशी ठाम आहे. गुन्हेगाराच्या फ्लेक्स बोर्डवर कोणीही फोटो लावल्यास त्याच्यावर देखील कारवाई होणार. मग तो नगरसेवक का असेना त्याला सोडणार नाही. निमगाव हद्दीतील 11 नंबर चारी वरील रहिवाशांचा पुनर्वसन होणे गरजेचे आहे. शिर्डी शहरातील नाला रोड, आंबेडकर नगर असेल पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर देखील लोक जात नसेल तर त्यात नगरपालिकेची चूक नाही. नगरपालिका नाईलाजाने अतिक्रमणाची कारवाई करणार असल्याचे डॉ.सुजय विखे यांनी म्हटले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात मोठे मंत्री हनी ट्रॅपमध्ये, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात...

भयंकर! शॉपिंग मॉलला भीषण आग, 60 जणांचा मृत्यू; अनेक जण जिवंत जळाले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - इराकमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग लागली. या आगीमध्ये लहान...

संदीप थोरात आणखी गोत्यात; ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा, पत्रकार परिषदेत मोठी माहिती उजेडात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री क्लासिक ब्रीज, मनीमॅक्सच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्यानंतर सह्याद्री मल्टीसिटी निधी लि....

डांगे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते?; किरण काळे यांचा सवाल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मनपातील 776 रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे 350 ते 400 कोटींच्या महाघोटाळ्याच्या...