spot_img
अहमदनगरशिर्डीत महाविकास आघाडीला तडा जाणार? उत्कर्षा रूपवते 'वंचित' च्या संपर्कात

शिर्डीत महाविकास आघाडीला तडा जाणार? उत्कर्षा रूपवते ‘वंचित’ च्या संपर्कात

spot_img

शिर्डी | नगर सह्याद्री
शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा काँग्रेस पक्षाला न मिळाल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या युवा नेत्या व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षां रुपवते यांनी मुंबईत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची राजगृहावर भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रुपवते या तिसर्‍या आघाडीच्या संपर्कात असल्याने त्यांची बंडखोरी निश्चित मानली जात आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असल्याने आपल्या नावाची घोषणा होईल, अशी रुपवते यांना खात्री होती; परंतु या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज आहेत. उत्कर्षां रुपवते यांना, काँग्रेसचे निष्ठावंत माजी मंत्री स्व. दादासाहेब रुपवते व विधानसभेचे माजी सभापती स्व. मधुकरराव चौधरी यांची नात व वडील बहुजन शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. प्रेमानंद रुपवते असा मोठा राजकीय वारसा आहे.

त्यांना उमेदवारी नाकारल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांचे समर्थक व काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आहेत. प्रेमानंद रुपवते यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्कर्षां रुपवते यांनी गेल्या दोन वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...