Maharashtra Politics News: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानतंर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाराष्ट्र सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नागपुरातील राजभवनात हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाची टीम फायनल होत आली आहे. मंत्रिपदासाठी शिंदेगटाकडून काही आमदारांना फोन गेले आहेत. यात कोणाचा नंबर लागला? अन् कोणाचा पत्ता कट झाला? पाहूया संभाव्य मंत्र्यांची नावं..
महायुतीच्या मंत्रिमंडळात भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांना संबंधित पक्षाचे वरिष्ठांचे फोन जाण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान आज भाजपसह शिवसेना शिंदे गटाची यादी समोर आली आहे.शिवसेनेत 5 जुने मंत्री आणि 7 नवीन आमदारांना म्हणजे एकुण 12 जणांना संधी मिळणार आहे.
या आमदारांना गेले शिंदेगटाकडून फोन
१.भरत गोगावले
२.उदय सामंत
३.प्रताप सरनाईक
४.योगेश कदम
५.आशिष जैस्वाल
६.गुलाबराव पाटील
७.शंभूराजे देसाई
८.प्रकाश आबीटकर
९. दादा भूसे
पाच जुन्या मंत्र्यांना मिळणार पुन्हा संधी
1. उदय सामंत, कोकण
2. शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
3. गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
4. दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
5. संजय राठोड, विदर्भ
या नेत्यांचा पत्ता कट?
1. दीपक केसरकर
2. तानाजी सावंत
3. अब्दुल सत्तार