spot_img
अहमदनगरमनपा, झेडपीसाठी शिंदे सेना सज्ज; शनिवारी नगरमध्ये मेळावा

मनपा, झेडपीसाठी शिंदे सेना सज्ज; शनिवारी नगरमध्ये मेळावा

spot_img

संपर्कमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे सेना सरसावली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत उद्या शनिवारी शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील माउली संकुल येथे होणार आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शहर संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख अनिल शिंदे, बाबूशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, माजी नगरसेवक संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, श्याम नळकांडे आदी उपस्थित होते. जाधव पुढे म्हणाले, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या उपस्थितीत मुंबईत गत महिन्यात बैठक झाली. त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केलेल्या आहेत. संपर्कमंत्री शंभुराज देसाई शनिवारी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

या बैठकीत महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत. जिल्हा संपर्कप्रमुख शिंदे म्हणाले, राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बैठका घेण्यात येत आहेत. संभाजी कदम म्हणाले, शहरासह ग्रामीण भागातील काही नेते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांचे प्रवेश शनिवारी होणाऱ्या बैठकीत होणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खरे असणारे दीड किलो सोने बनावट कसे झाले?: बाबासाहेब तांबे

गोरेश्वर पतसंस्था बाजीराव पानमंद व कुटुंबाने खासगी प्रॉपट असल्यागत चालवल्यानेच ही संस्था अडचणीत आली! पारनेर...

शिवसेना-मनसे युतीबाबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; आता थेट…

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे...

27 केंद्रांना कृषी विभागाचा दणका; किती परवाने केले निलंबित?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री खरीप हंगाम 2025 अनुषंगाने कृषी विभागाने जिल्हाभरात कृषी सेवा केंद्रांची व्यापक...

एक पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावलं पुढे येतील; युतीसाठी मनसेची भूमिका जाहीर

मुंबई | नगर सह्याद्री राज्यात नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वेगळं...