spot_img
अहमदनगर'शिंदे गटाने नगर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांवर ठोकला दावा'

‘शिंदे गटाने नगर जिल्ह्यातील दोन मतदारसंघांवर ठोकला दावा’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. नगर जिल्हयातील श्रीरामपूर, नेवासा विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी प्रभारी आणि निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली असून बैठका सुरू झाल्या आहेत. दोन्ही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रभारी म्हणून उल्हासनगरचे माजी महापौर राजेंद्र चौधरी यांची नियुक्ती केली आहे. चौधरी यांच्या कुटुंबातील पाच जण सध्या नगरसेवक आहेत. तसेच श्रीरामपूर विधासभेच्या निवडणूक निरीक्षक पदाची जबाबदारी राजू वाघमारे यांच्यावर सोपवली आहे.

शिंदे गटात येण्यापूर्वी वाघमारे यांनी काँग्रेसचे प्रवक्ते पदाची जबाबदारी पार पाडलेली आहे. तसेच ते मूळ संगमनेरचे असल्याने त्यांचा या जिल्ह्याशी संपर्क राहिलेला आहे. नेवासा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी जेरी डेविड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डेविड हे ठाण्याचे नगरसेवक असून मुख्यमंत्री शिंदे यांचे ते खास समजले जातात. या अनुषंगाने राजू वाघमारे यांनी श्रीरामपुरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी बूथ प्रमुख, गटप्रमुख, गण प्रमुख आदींच्या नेमणुका त्वरित करा अशा सूचना त्यांनी दिल्या.

दरम्यान, नेवासा मतदारसंघात गतवेळी आ. शंकरराव गडाख यांनी क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यानंतर त्यांनी उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्याबदल्यात त्यांना मंत्रिपदही देण्यात आले होते. आता गडाख कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवितात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यात आता या मतदारसंघाकडे शिंदे गटाने मोर्चा वळविला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार कोण? याबाबतही उत्सुकता आहे. तसेच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघावरही या गटाने लक्ष केंद्रीत केले आहे.

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. तेही इच्छुक असून अन्य काहींनीही या गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही मतदारसंघात प्रथमच शिंदे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. दोन्ही मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. एखादा तगडा उमेदवार हाती लागतो का? यासाठीही या गटाने प्रयत्न सुरू केले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मंत्री विखे शेतकऱ्यांच्या बांधावर; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी, दिले महत्वाचे आदेश..

पाथर्डी | नगर सह्याद्री सोमवारी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अनेक भागात अतिवृष्टी...

आयत्या पिठावर रेघोट्या मारून, खोटे सांगून क्रेडिट का घेता?; माजी मंत्री थोरात यांचा विरोधकांना सवाल

संगमनेर | नगर सह्याद्री दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता सहकारमहष भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या...

जीएसटी समितीच्या अहिल्यानगर शहर संयोजकपदी निखिल वारे

अहिल्यानगर | नगर सह्याद्री वस्तू आणि सेवांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सर्वसामान्यांसाठी लाभकारक आहे. पंतप्रधान...

महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 40 जणांचा आक्षेप, वाचा, सविस्तर

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती दाखल करण्यासाठी दिलेल्या अंतिम दिवसापर्यंत (15...