spot_img
अहमदनगरभाजपचे शिलेदार, शिवसेनेचे उमेदवार; संगमनेरात कुणाला मिळाली संधी?

भाजपचे शिलेदार, शिवसेनेचे उमेदवार; संगमनेरात कुणाला मिळाली संधी?

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीसाठीच्या 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना, नेवाशातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंके आणि संगमनेरातून भाजपचे अमोल खताळ यांना संधी देण्यात आली आहे.

नगर जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघातील विविध पक्षांचे उमेदवार जाहीर करण्यात आले. पण या महत्त्वाच्या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळते याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. आता या उमेदवारी जाहीर झाल्याने या पक्षाच्यावतीने लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्र्रेस व अन्य पक्षांचे उमेदवार जाहीर झाले. पण शिंदे सेनेच्या उमेदवारांबाबत उत्सुकता होती. या मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे, प्रशांत लोखंडे यांच्यासह अनेकजण उत्सुक होते. अखेर कांबळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीने शिवसेनेच्या शिंदे गटातून अमोल खताळ यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात सुरू असलेली डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा संपुष्टात आली आहे. खताळ सध्या भाजपात आहेत. विखे गटाचे समर्थक म्हणून ते संगमनेर मतदारसंघात सक्रीय आहेत. मात्र आता मित्र पक्षात प्रवेश करून ते निवडणूक रिंगणात उतरतील.

दरम्यान, नेवाशातून उमेदवारी मिळण्यासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्यामध्ये रस्सीखेच चालू असतानाच रात्री उशिरा अचानकपणे विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे नेवासा तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवासी असलेले विठ्ठलराव लंघे हे भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष असून नगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते विश्वासू सहकारी म्हणून जिल्ह्यामध्ये परिचित आहेत. आता लंघे यांना भाजपाला सोडचिठी देऊन शिवसेनेत प्रवेश करावा लागणार आहे.

भाजपचे शिलेदार; शिवसेनेचे उमेदवार
नगर जिल्ह्यात भाजप 5 जागा लढवत आहे. मात्र आता भाजपातील 2 पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाकडून लढताना दिसतील. नेवासा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेले विठ्ठलराव लंघे हे तर भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. तर खताळ अडीच वर्षांपासून संगमनेर मतदारसंघात भाजप पक्षवाढीसाठी सक्रीय होते. दोघांना पक्षाने एबी फॉर्म प्रदान केले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दंडगव्हाळ, सपकाळेंनी खाकीची केली बेअब्रू!; एसपी साहेब, तुमच्या नावाचा होतोय गैरवापर!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री पोलिस अधीक्षक म्हणून खमकी भूमिका बजावत असणाऱ्या सोमनाथ घार्गे यांच्या टीममध्ये...

गट, गणांची मोडतोड; कही खुशी कही गम; जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर

जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या गट-गणांची अंतिम प्रभाग रचना जाहीर | इच्छुकांचे मैदान ठरले अहिल्यानगर |...

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची मोठी कारवाई; गोवंशीय जनावरांची कत्तल करणारी टोळी १ वर्षासाठी हद्दपार

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची तिसरी मोठी कारवाई राहाता । नगर सहयाद्री  ममदापुर (ता. राहाता)...

पत्नीचा खून पतीची आत्महत्या; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना

कोपरगाव / नगर सह्याद्री : कोपरगाव तालुक्यातील चासनळी गावात शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी...