spot_img
अहमदनगरशरद पवार यांचे प्राजक्त तनपुरेंबाबत महत्वाचे विधान, नेमकं काय म्हणाले पहा...

शरद पवार यांचे प्राजक्त तनपुरेंबाबत महत्वाचे विधान, नेमकं काय म्हणाले पहा…

spot_img

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे जाहीर सभा
राहुरी | नगर सह्याद्री
फोडाफोडीमुळे लोकसभेत भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच जनता विधानसभेतही त्यांना नाकारेल आणि राज्यात सत्तांतर होईल. प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे प्रचारसभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला. यावेळी त्यांनी आमदार प्राजक्त तणपुरे यांचंदेखील कौतुक केलं. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते. फोडायला लागत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ३०-४० आमदार गोळा केले. गुवाहाटीला जाऊन बसले. ही एक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होती. उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात होती. असं असतानाही त्यांनी पक्ष फोडण्याची भूमिका घेतली. लोकांना हे पटलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात मोठं काम काय केलं? विचारल्यानंतर पक्ष फोडला म्हणून सांगतात. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, असा घणाघात शरद पवारांनी आपल्या भाषणात केला.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राहुरीला आलो होतो. तुम्ही आपला उमेदवार निवडून दिला त्याबद्दल तुमचे आभार. मागच्यावेळी काँग्रेसचा एक आणि आमचे चार खासदार होते. मात्र घटना धोयात असल्याने तुम्ही आमचे ३१ खासदार निवडून दिले. आता भाजप आणि आमच्यातल्या फुटून गेलेल्या लोकांचे राज्य आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेकजण मंत्री होते. मात्र शिंदेंनी काही लोक घेतले आणि गुहाटीला जाऊन बसले. उद्धव ठाकरेंचे सरकार पाडले. पक्ष फोडून सत्ता मिळवणे ही लोकशाही आहे का? पक्ष फोडल्याचे देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले. पक्ष उभा करायला अक्कल लागते. मात्र फोडायला अक्कल लागत नाही, असा पुनरुच्चार शरद पवार यांनी केला.

भाजपला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही
देशात आम्ही सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंडिया आघाडी स्थापन केली. ४०० डाव उद्ध्वस्त करायचं ठरवलं. डाव उद्ध्वस्थ करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे होतं. निवडणुका आल्यानंतर आम्ही भूमिका मांडली. ज्या महाराष्ट्रात काँग्रेसचा १ खासदार, राष्ट्रवादीचे ४ खासदार होते. तुम्ही आम्हाला ४८ पैकी ३१ खासदार दिले, राष्ट्रवादीला ८ खासदार दिले. लोकसभेच्या निकालानंतर यांची चिंता वाढली. नवनवीन योजना आणताय. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर यांनी काही योजना राबवल्या. मात्र आज महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रात अनेक बहिणींचा पत्ता लागत नाही आणि तुम्ही लाडया बहिणी म्हणता. आज महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात ११०० पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. शेतकर्‍यांच्या हाताला आलेलं पीक वाया गेलं, शेतकर्‍याला कर्ज फेडता आलं नाही. पीकाला भाव मिळाला नाही. त्याने घटाघटा विष पिलं आणि आत्महत्या केली. त्यामुळे भाजपला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, अशी टीका शरद पवारांनी केली.

प्राजक्त तनपुरे यांनी जनतेसाठी कामे केली – पवार
यावेळी शरद पवार यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले. प्राजक्त तनपुरेसारखा जानकार, अभ्यासू आमदार तुमच्याकडे आहे. कमी काळ मंत्री होते. मात्र त्यांनी काम चांगल केलं. चंद्रपुरात सभा संपल्यानंतर लोकांना विचारलं की वीजेचे प्रश्न सुटले का? प्राजक्त तनपुरेसारखा मंत्री दिला तो आमच्यापासून टोकाला आला आणि आमचे सगळे प्रश्न सोडवले. जे जे काम आम्ही घेऊन गेलो, नम्रपणे वर्तवणूक करतो, याचा आनंद आहे असं ते बोलले. मला अभिमान आहे प्राजक्त तनपुरेंने जनतेसाठी कामं केली. पुन्हा एकदा प्राजक्त तनपुरेला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा. पहिल्या निवडणुकीत त्यांच्या कामाची पद्धत ओळखली. महाराष्ट्राची सत्ता आम्हाला दिली तर प्राजक्त तनपुरे राज्यासाठी काम करतील, असं शरद पवार म्हणाले.

समोरच्या उमेदवाराकडे मुद्दाच नाही
आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की मतदारसंघात सहा नवीन सबस्टेशन व ४०० पेक्षा अधिक ट्रान्सफार्मर बसविण्याल आहे. महाविकास आघाडी शासन काळात असंख्य शेतकरी हिताच्या योजना राबविल्या आहेत. परंतु या सरकारने त्या बंद केल्या. समोरील उमेदवाराकडे बालण्यासारखा कुठलाही मुद्दा नाही. निळवंड धराचे पाणी आणण्यासाठी विरोधकांनी तीन निवडणुका घालविल्या. विरोधकांनी समोरासमोर चर्चेस यावे. पुढील पाच वर्षात शेतकर्‍यांसाठी दिवसा वीज दिली जाईल असे सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विरोधकांना हलक्यात घेणे लंकेंना महागात पडले! बुक्का अन् वाजंत्री गँगने दाखवला हिसका

पारनेरकरांनी थोपविलं लंके यांचे प्रस्थापित होणं | सुजय विखेंचे सुदर्शन चक्र चालले | बुक्का...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‌’ यशस्वी अन्‌‍ आरक्षणाच्या फुग्याला टाचणी; महायुती 200 पार अन्‌‍ मविआचा..

फडणवीसांची जादू; ‌‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‌’ यशस्वी अन्‌‍ आरक्षणाच्या फुग्याला टाचणी अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- फुले,...

अहिल्यानगरमध्ये महायुतीच! महाविकास आघाडीचं पानिपत

महाविकास आघाडीचं पानिपत | हेमंत ओगलेंनी वाचवली इज्जत | शरद पवारांसह ठाकरेसेनेला झिडकारले विजयी: भाजप...

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच; संगमनेर शहरातून निघणार विजयाची मिरवणूक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगरच्या १२ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास...