spot_img
ब्रेकिंगशरद पवार यांची तब्येत बिघडली, ४ दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द

शरद पवार यांची तब्येत बिघडली, ४ दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री –
ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बरी नसल्याने त्यांचे पुढील ४ दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यांना खोकल्यामुळे कार्यक्रमात बोलताना त्रास होत आहे. यामुळे पुढील ४ दिवसांचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार गेली दोन दिवस कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यानच्या कार्यक्रमांत बोलताना त्यांना खोकल्यामुळे त्रास जाणवत होता. आताही त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांचे पुढील ४ दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

शरद पवार यांनी नुकतेच सांगली दौऱ्यादरम्यान जत तालुक्यातील संख या गावात स्व. बसवराज सिद्धगोंडा पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. तर कोल्हापूरमध्ये व्हाईट आर्मी संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते उपस्थित राहिले होते. दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्या रविवारी (दि. २६ जानेवारी २०२५) रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी मुंबई विभागीय कार्यालय तसेच सकाळी १० वाजून १० मिनिटांनी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहण करण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर महाविद्यालयात गुंडाराज! रक्ताचा सडा, तरुणावर सपासप 15 वार

महाविद्यालयात रक्ताचा सडा | तरुणावर सपासप 15 वार | गुंड साहिल औटी व टोळीची...

अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाचचे रविवारी उद्घाटन; सावेडी उपनगरात निघणार भव्य नाट्य दिंडी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : नगरमध्ये दि.२६ व २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित अखिल...

नगरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान!, कुठे घडली घटना पहा…

जेऊर येथील घटना ; वनमित्रांची मदत ; नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन अहिल्यानगर / नगर सह्याद्री...

जगणं थंड झालं हे मान्य करा अन्‌‍ विद्रोही व्हा!

‌‘वाल्मिक‌’ सारख्या प्रवृत्ती जन्माला येण्याआधी ठेचा | चला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बंडोबा होण्याचा निर्धार...