spot_img
महाराष्ट्रशरद पवार गटाला मिळाले 'तुतारीवाला माणूस' चिन्ह !

शरद पवार गटाला मिळाले ‘तुतारीवाला माणूस’ चिन्ह !

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : राष्ट्रवादी मध्ये दोन गट पडल्यानंतर पक्षाचे नाव व चिन्ह हे अजित पवार यांना देण्यात आले. त्यानंतर शरद पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिल आहे. शरद पवार गट आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव आणि तुतारीवाला माणूस हे चिन्ह शरद पवार गटाकडे असणार आहे.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात
या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कांद्याला भावच नाही, शेतकऱ्याने काय केले पहा…

रांधेतील शेतकर्‍याने कांद्याला भाव नसल्याने पीक केले नष्ट पारनेर | नगर सह्याद्री गेल्या वर्षभरात कांद्याला सरकारने...

अजित पवार.. सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाय!; महाराष्ट्रात राजकारण तापले, माफीनामा अन कोण काय म्हणाले..

माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं सोलापूर | नगर सह्याद्री सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुयातील अनगर...

​कामरगावात दुकानदाराचे घर फोडले; पावणेदोन लाखांचा ऐवज लांबविला

​लबाडीच्या इराद्याने घरातील वस्तू, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला; नगर तालुका पोलिसांत गुन्हा...

आमदार काशिनाथ दाते यांनी मोठे यश; एक वर्षात काय काय केले…

पारनेरला ६० तर अहिल्यानगर तालुक्याला ९ कोटींचा निधी / | नवनागापूरमधील कार्यक्रमात एक वर्षांतील...