spot_img
ब्रेकिंगPolitics News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांचे मोठे विधान, पहा काय...

Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांचे मोठे विधान, पहा काय म्हणाले..

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी पवार यांचा निर्धार
पुणे | नगर सह्याद्री
गेले २५ वर्ष आपण विचारधारा वाढवण्याचा प्रयत्न केला. आता मजबुतीने आपण हा पक्ष आणखी पुढे नेऊया. तीन महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येईल. तुमची, माझी सगळ्यांची जबाबदारी. आता एकच लक्ष, ते म्हणजे तीन- चार महिन्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता तुमच्या हातात असेल, अशी भूमिका घेऊ. या सत्तेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना, शेवटच्या घटकांपर्यंत कसा होईल याची काळजी घेऊ, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पुण्यामध्ये पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वतीने पक्ष कार्यालयात ध्वज फडकावला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी आगामी वाटचालीबाबत सर्वात महत्वाचे विधान केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापनदिन. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्या गटाचा अहमदनगरमध्ये हा वर्धापनदिन सोहळा पार पडणार आहे. त्याआधी पुण्यामध्ये पक्ष कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आदी नेते यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी विधानसभेत सत्ता खेचून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

आजचा दिवस पक्ष स्थापनेला २५ वर्ष झाले, याबाबत आभार व्यक्त करण्याचा दिवस आहे. एक अशी संघटना उभी केली या संघटनेला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर एक प्रकारचा नवा इतिहास तयार केला. अनेक गावामध्ये ज्यांच्या घरात सत्तेशी, राजकारणाशी संबंध नसणारे पण सामाजिक बांधिलकी असणारे अनेक तरुण पुढे आले अन् त्यातून त्या भागाचे नेतृत्व पुढे आले. ते नेतृत्व त्या भागापुरते मर्यादित न राहता जिल्ह्यावर, राज्यपातळीवर गेले.

आज देश एका वेगळ्या स्थितीतून निघाला आहे. देशाची सत्ता मोदींच्या हातात आली पण खर्‍या अर्थाने निकाल मोदी सरकारच्या सोईचा नव्हता. संसदेत त्यांचे बहुमत नाही, अशी स्थिती निर्माण झाली. त्यांना इतर पक्षांची मदत झाली नसती तर सरकार आले नसते. गेल्या पाच वर्षात दोन व्यक्तींनी सरकार चालवले, सुदैवाने देशातील जनतेने याची नोंद घेऊन त्याप्रकारे मतदान केले, त्यामुळे सामान्य माणूस तुमच्या माझ्यापेक्षा अगदी शहाणा आहे. जागरुक आहे, असे शरद पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Badlapur School Crime: एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण? आरोपी अक्षय शिंदेच्या डोक्यात गोळी झाडली..

Badlapur School Crime: महाराष्ट्रातील बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार (Badlapur School Crime) प्रकरणातील आरोपी...

Politics News: मंत्रिमंडळ बैठकीत खटके उडाले; अजित पवार-विखे पाटील यांच्यात वाद! कारण काय?

Politics News: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ( Radhakrishna...

तहसीलदार गायत्री सौंदाणे यांची धडाकेबाज कारवाई! अखेर ‘तो’ रस्ता वहिवाटीसाठी खुला

सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण ते हिंगणी रस्ता (बेलवंडी फाट्यापर्यंत) अनेक वर्षापासून...

माजी नगराध्यक्ष विजय औटींना जामीन मंजूर!

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी यांना...