spot_img
अहमदनगरशरद पवार यांचे अहमदनगर जिल्हा बँकेविषयी मोठे विधान; म्हणाले, आता काळजी वाटायला..

शरद पवार यांचे अहमदनगर जिल्हा बँकेविषयी मोठे विधान; म्हणाले, आता काळजी वाटायला..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
जेष्ठ नेते खा.शरद पवार यांनी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेविषयी बाळासाहेब थोरातांकडे चिंता व्यक्त केली आहे. बाळासाहेब, मला नगर जिल्हा सहकारी बँकेची आता काळजी वाटायला लागलीय, असे म्हणत, आज तिथे कशी आणि कोणती लोकं बसलीत, त्यावर भाष्य न केलेलं बरं. तिथे काय शिजतंय ते सगळ्यांना माहिती आहे, असा टोला शरद पवार यांनी भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला.

जी. एस. महानगर बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष (कै.) उदय शेळके यांच्या नावाने सुरू होणार्‍या उदय गुलाबराव शेळकफाउंडेशनचे बोधचिन्ह आणि संकेतस्थळ अनावरण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत झाला. त्यावेळी त्यांनी नगर जिल्हा सहकारी बँकेच्या भवितव्याविषयी मोठे विधान केले.तसेच सॉलिसीटर (कै.) गुलाबराव शेळके आणि त्यांचे चिरंजीव (कै.) उदय शेळके यांनी सहकारात दिलेल्या योगदानाची आठवणींना उजाळा दिला. या दोघांनंतर बँकेची धुरा संभाळत असलेल्या गीतांजली शेळके यांचे कौतुक करत बँकेविषयी कोणताही प्रश्न असेल, अडचणी असतील, तर मांडत चला, त्यावर मार्ग काढण्याचा नक्की प्रयत्न करेल, अशी शरद पवार यांनी ग्वाही दिली.

मुंबईमध्ये झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, खासदार नीलेश लंके, जिल्हा बँके व महानगर बँकेच्या संचालिका गितांजली शेळके, राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, पद्मश्री पोपटराव पवार, माजी आमदार सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते अरुण कडू पाटील उपस्थित होते. शरद पवार यांनी गुलाबराव यांच्यानंतर उदय आणि त्यांच्यानंतर गीतांजली शेळके यांनी बँकेची जबाबदारी संभाळत आहेत. उदय शेळके यांनी नगर जिल्हा सहकारी बँकेचे देखील नेतृत्व केले. महाराष्ट्रात नगर जिल्हा सहकारी बँक देखील दिग्गज बँकेपैकी एक आहे. पण बाळासाहेब थोरात आता या बँकेविषयी काळजी वाटते, असे म्हणत आज तिथे कशी आणि कोणती लोकं बसलीत त्यावर भाष्य न केलेलं बरं. तिथे काय शिजयंत ते सगळ्यांना माहिती आहे, असे टोला लगावला.

नगरमध्ये सहकारी कारखान्याच उगम नगर जिल्हा सहकारी बँक आणि महानगरसारख्या बँकांमुळे झाला. कारखानदारी वाढली. अनेक कारखाने उत्तम चालू आहेत. बाळासाहेबांचा कारखान्याचे व्यवस्थापन उत्तम आहे. लौकीक आहे. बँकेचे काही प्रश्न असतील, तर हक्काने माझ्याकडे या, प्रश्न मांडा, त्यावर मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, असे शरद पवार यांनी आश्वासन दिले.

बँकेवर राजकीय वर्चस्वासाठी चढाओढ
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर भाजपचे वर्चस्व आहे. भाजप नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री शिवाजी कर्डिले बँकेचे अध्यक्ष आहे. या बँकेत भाजपविरुद्ध विरोधक, असा नेहमीच संघर्ष होतो. बँकेतील कामकाजावर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांची करडी नजर असते. त्यामुळे या बँकेतील राजकारणाचा प्रभाव सहकारी कारखान्यावर देखील पडतो. त्यामुळे नगर जिल्हा सहकारी बँकेवर वर्चस्व मिळण्यासाठी सहकारी कारखानदारांमध्ये आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांमुळे चुरस असते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘नगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक कराटेचा महामुकाबला’; भिडणार ‘इतके’ खेळाडू

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025...

बाप रे! १० लाखांचे घेतले ‘एवढे’; सावकारकीचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री उद्योजक महेश सुरेश गावडे (वय 30 रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांचे...

बालिकाश्रम रोडवरील अनधिकृत मजार हटवा; आ. संग्राम जगताप

अतिक्रमणाबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- अहिल्यानगर शहरातील बालिकाश्रम रोडवर असणारे थडग्याचे अतिक्रमण काढावे...

बीड जिल्हा पुन्हा हादरला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू, तिसरा गंभीर

बीड / नगर सह्याद्री : बीड जिल्ह्यात मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर...