spot_img
अहमदनगरशरद पवार देणार भाजपला मोठा धक्का! अहमदनगरचा बडा नेता 'तुतारी' फुंकणार?

शरद पवार देणार भाजपला मोठा धक्का! अहमदनगरचा बडा नेता ‘तुतारी’ फुंकणार?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
विधानसभेचे वारे वाहू लागल्यापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीमधील अनेक बडे नेते विधानसभेच्या निवडणुकांआधी तुतारी हाती घेण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. अशातच अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शयता आहे. नगरमधील भाजप नेते विवेक कोल्हे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे.

एकीकडे विधानसभेची मोर्चबांधणी सुरू असतानाच अहमदनगर जिल्ह्यामध्ये शरद पवार भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. नगरमधील कोपरगाव विधानसभेच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र भाजप नेते विवेक कोल्हे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मंगळवारी पुण्यामध्ये विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

विवेक कोल्हे शरद पवारांची भेट
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरी येथे बैठक पार पडत आहे. या बैठकीदरम्यान विवेक कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाया पडत शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले. या भेटीनंतर आता पुन्हा एकदा विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

पुन्हा काळे-कोल्हेंमध्येच लढत
गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांचा पराभव केल्यानंतर विवेक कोल्हे राज्यभरात चर्चेत आले होते. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी भाजपला आव्हान देत अपक्ष निवडणूक लढवली होती, तेव्हापासून कोल्हे यांनी भाजपमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा आहे. दुसरीकडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केल्याने कोल्हे यांची राजकीय अडचण झाली आहे. त्यामुळे ते तुतारी घेऊन विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, कोल्हे शरद पवार गटात गेल्यास कोपरगावमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होण्याची शयता आहे.

विखे पाटील, दराडेंना विवेक कोल्हे भीडले
विवेक कोल्हे यांनी गेल्या वर्षी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांच्या ताब्यात असलेला गणेश सहकारी साखर कारखाना हा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना सोबत घेऊन ताब्यात घेतला. त्यानंतर विखे पाटलांच्या तालुयातील तीन मोठ्या ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. तसेच यावर्षी नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले उमेदवार किशोर दराडे यांना टक्कर देऊन कोल्हे दुसर्‍या क्रमांकावर राहिले. महायुतीच्या उमेदवाराविरोधात अपक्ष उभे राहिल्याने त्यांच्या कारखान्यांवर आणि संबंधित शैक्षणिक संस्थांवर शासनाने धाडी टाकल्या. महसूलमंत्री विखे पाटलांना आणि आमदार दराडे यांना टक्कर देऊन विवेक कोल्हे राज्यभर चर्चेत आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...