spot_img
ब्रेकिंग“शरद पवार, तुम्ही आतापर्यंत काय केलं; भरसभेत राज ठाकरेंचा सवाल; पवार-शिंदेनाही सुनावलं!

“शरद पवार, तुम्ही आतापर्यंत काय केलं; भरसभेत राज ठाकरेंचा सवाल; पवार-शिंदेनाही सुनावलं!

spot_img

माय नगर वेब टीम
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, कार्यकर्ता मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पण्यांना उत आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून राज ठाकरेंनी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली आहे. गोरेगाव येथे नेस्कोत आज त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध घटनांवर भाष्य करत शरद पवार यांच्यावरही टीका केली.

निवडणुकीसाठा जागा वाटपाची चर्चा सुरू असताना प्रत्येकवेळी विचारावं लागतंय की हा नेता आता कुठे आहे. निष्ठा वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही? आणि महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान करते. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार. अशी अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली”, असं राज ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “कालचा दसरा मेळावा पाहिला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखे वाघनखे काढतात, इथून अफजल आला, शाहिस्तेखान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. तिकडे पुष्पाचं वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे, मै आयेलाय असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करून दाखवली. मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही. कोण निवडून आला, कोणाला मतदान केलं, सध्या ते काय करतात अशा पद्धतीने महाराष्ट्रात मी पाहिलंच नाही. मला कळेच ना काय सुरूय?”

“शरद पवार सांगत आहेत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर नारायण राणेंना फोडलं, तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? आणि मी आता अजित पवारांबद्दल बोलतच होतो. आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहिती नाही. भाजपा यांना स्वीकारतो तरी कसा? अजित पवार भाजपात यायच्या ८ दिवस अगोदर मोदी म्हणाले होते की ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकू. पण जेलमध्ये टाकण्याएवजी त्यांना मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय?”असा प्रश्नही राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेा विचारला.

“शरद पवार नास्तिक आहेत, असं खुद्द त्यांची लेक सुप्रिया सुळेंनी लोकसभेत सांगितलं होतं. पण मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा ते सर्व मंदिरात जाऊन पाया पडायला लागले. पण त्यांचे हे पाया पडणंही खोटं आहे”, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

…तर महाराष्ट्र बरबाद होत जाणार
सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही? गद्दारी करणारा प्रत्येकजण तुम्हाला का आवडतो? आमदार फोडाफोडी करायचे, राजकारण तापवायचं. एका पक्षाबरोबर निवडणूक लढवायची, विचारांची प्रतारणा करून दुसऱ्याबरोबर सत्तेत बसायचं, हेच आपण पाच वर्षे पाहतोय. सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस हवा की फोडाफोडीचं राजकारण करणारी असली माणसं पाहिजेत? आज जर महाराष्ट्रातील जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा. नको त्या विषयांची घाण पसरत जाणार महाराष्ट्रात”, असंही राज ठाकरे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...