सातारा / नगर सह्याद्री –
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीसाठी राजकारण चांगलेच तापले आहे. टोकाचे आरोप होऊ लागले आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांची शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे. यशवंत विचारांवर बोलण्याची शरद पवारांची लायकी नाही अशी टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांची यांनी केली आहे. या आरोपामुळे अनेकांच्या भुवया उंचावाल्या आहेत.
सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अशा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने आ.महेश शिंदे यांनी हे आरोप केले आहेत. सातारा लोकसभा मतदार संघात शशिकांत शिंदे यांची उदयनराजे यांच्याशी तगडी लढत होणार आहे. शशिकांत शिंदे यांनी 4 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
आरोपांना प्रत्युत्तर
मी दोषी आढळल्यास उमेदवारी अर्ज भरणार नाही’ असं वक्तव्य आमदार शशिकांत शिंदेंनी केले आहे. नवी मुंबई बाजार समितीच्या गाळे विक्री प्रकरणात 4 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप महेश शिंदेंनी केला होता. त्यानंतर शशिकांत शिंदेंनी हे प्रत्युत्तर दिले आहे.