spot_img
अहमदनगरशरद पवार यांनी सोडले उपोषण; खा लंके यांच्या हस्ते घेतले पाणी...

शरद पवार यांनी सोडले उपोषण; खा लंके यांच्या हस्ते घेतले पाणी…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद पवार हे नगर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसले होते त्यांनी चिचोंडी पाटील येथील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करा व साईनगर मधील केलेले अतिक्रमण त्वरित काढा या मागणीसाठी ते उपोषणाला बसले होते.

अखेर खा. निलेश लंके यांनी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी,बिडिओ यांना त्वरित सांगून दोषींवर कारवाई करावी व तेथील अतिक्रमण ग्रामपंचायतकडून काढण्यात यावे असे सांगित तसे पत्र दिले त्यावर त्वरित अधिका-यांनी ग्रामसेवकवर कारवाई करत अतिक्रमण काढण्याचे ग्रामपंचायतला आदेश काढले व खा.निलेश लंके यांच्या हस्ते पाणी पिऊन सरपंच शरद पवार यांनी आपले उपोषण सोडले. अखेर चिचोंडी पाटील या गावातील साईनगर भागातील अतिक्रमण हटवण्यात येईल व शरद पवार यांच्या उपोषणाला यश मिळाले आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, संदेश कारले,बाबासाहेब राष्ट्रवादीचे अशोक बाबर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के,प्रकाश पोटे, विलास शेडाळे,भाऊसाहेब काळे,रामेश्वर निमसे,भरत बोडखे, गणेश तोडमल, वसंत पवार, रमेश ठोंबरे, लांडगे सर, वैभव बोटे, दिलीप पवार, कल्याण कोकाटे सावकार, अरुण दवणे, राजेंद्र पवार, चंदूकाका पवार, मा. सरपंच अमोल निकरड, युवराज हजारे, वैभव कोकाटे, संजय गुंड, सरपंच विलास गवळी, रवीशेठ पवार, संदीप तापकीर, शिवाजी पाटील होळकर, बाळासाहेब खांदवे, शिवाजी कराळे पाटील, यांच्यासह चिचोंडी पाटीलचे ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सरपंच शरद पवार यांनी चार दिवस उपोषणाला आलेले गावातील सर्व ग्रामस्थ तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार यांचे आभार मानले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...

अहिल्यानगर: बिंगो, जुगार, दारु विक्रेत्यावर छापा; एकाच दिवशी धडक कारवाई

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने छापेमारी करत...