spot_img
ब्रेकिंगशरद पवारांनी जनाधार गमावला, आता त्यानी घरी बसावे; विखे पाटलांची टीका

शरद पवारांनी जनाधार गमावला, आता त्यानी घरी बसावे; विखे पाटलांची टीका

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:
जाणते राजे असणाऱ्या शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीत आपला जनाधार गमावला. त्यामुळे आता त्यांनी राज्याचे आणखी वाटोळे न करता घरी बसावे, अशा शब्दात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

गुरुवारी लोणी येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रो उत्सवानिमीत्त नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री विखे पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. तर सत्ताधारी महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यावेळी कुणीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केली नाही.

ईव्हीएमवर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज होती. तसेच निवडणूक नाकारण्याचीही गरज होती. जनमत बाजूने असले की ईव्हीएम चांगली, पण विरोधात गेले की वाईट अशी विरोधकांची गत झाली आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत एकमेकांवर खापर फोडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ते पळवाटा शोधत आहेत. शरद पवार जाणते राजे आहेत. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला जनाधार गमावला. त्यामुळे आता त्यांनी घरी बसावे. त्यांनी आतापर्यंत जनता व राज्याचे खूप वाटोळे केले. यापुढे त्यांनी ते करू नये असे ते म्हणाले.

विखे पाटलांनी यावेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा फेटाळून लावत मंत्रीपदाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असतील असेही ठणकावून सांगितले. एकनाथ शिंदे नाराज असल्याचे रान माध्यमांनी उठवले आहे. पण ते नाराज असण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांनी स्वतः भाजपचा जो काही निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल असे सांगितले आहे. आमची पहिली पसंती ही देवेंद्र फडणवीस यांना आहे.

विशेषतः संभाव्य मंत्रिपदांबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांनाच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे वेगळे काही मागण्याची काहीच गरज नाही. पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आगहे. त्यानुसार ते मला चांगलीच जबाबदारी देतील याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...