spot_img
ब्रेकिंगशरद पवार यांच्या गटाला हादरा बसणार!! तुतारी' सोडून 'बडा' नेता 'कमळ' हाती...

शरद पवार यांच्या गटाला हादरा बसणार!! तुतारी’ सोडून ‘बडा’ नेता ‘कमळ’ हाती घेणार?

spot_img

जळगाव । नगर सहयाद्री-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच भाजपत स्वगृही परतणार असल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ खडसे रविवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या वादामुळे एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली.

ते भाजपबरोबर गेले, पण खडसे यांनी शरद पवारांसोबतच राहणे पसंत केले. गत काही दिवसांपासून एकनाथ खडसे भाजपत परतणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. पण खडसे यांनी वेळोवेळी हीच चर्चा फेटाळून लावली. पण आता एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची तुतारी सोडून भाजपचे कमळ हातात घेणार असल्याची माहिती आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...