spot_img
महाराष्ट्रशरद पवार-अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र? कुटूंबातील सदस्याचे महत्वाचे विधान

शरद पवार-अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र? कुटूंबातील सदस्याचे महत्वाचे विधान

spot_img

Maharashtra politics News उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. त्यातच आता आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी एक महत्वाचे विधान केले आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुनंदा पवार यांनी, कालची भेट कौटुंबिक होती. शरद पवार 85 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व लोक आले होते. दरवष आम्ही सर्व कुटुंबिय शरद पवारांना भेटत असतो. आता कुटुंब म्हणून एकत्र येण्याची गरज आहे.असे त्यांनी म्हटले आहे.

भविष्यात हे एकत्र येऊ शकतात
अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार का असा सवाल त्यांना यावेळी करण्यात आला. त्यावर त्यांनी याविषयी काहीही सांगता येणार नसल्याचे म्हटले. तसेच सगळ्याच कुटुंबांमध्ये मतभेद असतातच. मतभेद मिटतील. भविष्यात हे एकत्र येऊ शकतात. त्यांनी एकत्र यायला पाहिजे असे मला वाटते, असेही सुनंदा पवार म्हणाल्या. त्यासोबतच जर मूठ घट्ट असेल, तर त्याची ताकद राहते. आपण विखुरलेले राहू तर ती ताकद कमी होते. पण कुणी कुणासोबत जायला हवे हा निर्णय त्या दोघांनी घ्यायला हवा, असेही म्हणत त्यांनी निर्णय दोन्ही पवारांवर सोडला आहे. दरम्यान शरद पवार यांनी 60 वर्ष राजकारणात काढले आहेत. हा सत्तेत जायचे की नाही हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असल्याचे त्या म्हणाल्या.

देर आये पर दुरूस्त आये
सुनंदा पवार यांच्या प्रतिक्रियेला अजित पवार गटाकडून लगेच उत्तर मिळाले आहे. विधानपरिषेदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, सुनंदा पवार यांची प्रतिक्रिया स्वागतार्ह आहे. पण त्यासाठी थोडा उशीरच झाला. षण्मुखानंद येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी हीच भूमिका काही काळापूव मांडली होती. आता या प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात 41 आमदार निवडून आले आहेत. एक लोकसभा तर दोन राज्यसभेचे खासदार आहेत. अशावेळेस देर आये पर दुरूस्त आये असे म्हणून त्यांना एकत्र यायचे असेल तर त्यांनी अजित पवार यांचे नेतृत्व मान्य करून एकत्र यावे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पवार साहेबांच्या गोटात, ‌‘कुछ तो गड़बड़ है‌’!

शिवाजी शिर्के | नगर सह्याद्री दिल्लीत सध्या ज्या बैठकांचा जौर वाढला. त्यातून कुछ तो गडबड...

दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी काम करणार; मुख्यमंत्री फडणवीस

पद्मश्री पोपटराव पवार यांनी केला सत्कार अहिल्यानगर | नगर सह्याद्री दुष्काळी महाराष्ट्राच्या पाण्यासाठी जास्त काम करणार...

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर संक्रात; ‘ईतका’ मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सर्जेपुरा येथील शेरकर गल्लीतील एका घरात विक्री करण्याच्या उद्देशाने नायलॉन मांजा...

बीडचा झालाय बिहार! पुन्हा घरात घुसून ‘गोळीबार’

Maharashtra Crime News: बीडमध्ये बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणातील आरोपीने बीड...