spot_img
ब्रेकिंगशरद पवार-अजित पवार एकत्र!; बंद दाराआड चर्चा, चर्चांना उधाण...

शरद पवार-अजित पवार एकत्र!; बंद दाराआड चर्चा, चर्चांना उधाण…

spot_img

पुणे / नगर सह्याद्री –
शरद पवार आणि अजित दादा हा पवार कुटुंबियांसाठीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी पण हळवा कोपरा आहे. काका-पुतण्यात दिलजमाई होण्याच्या चर्चांना अचानक अधूनमधून उकळी येते. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही नेते एकाच मंचावर दिसून आले. पण यावेळी दादांनी, काकांच्या शेजारी बसणं टाळलं. नावाची पाटीची जागाच बदलली. अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील बसले होते.

माझा आवाज दोन खुर्च्या सोडूनही जाऊ शकतो
12 डिसेंबर 2024 रोजी शरद पवार यांच्या वाढदिवासानिमित्त दिल्लीत अजित पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या. दोन्ही नेते एकत्र येण्याच्या वावड्या अनेकदा उठल्या. आज पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. त्याचे अध्यक्ष शरद पवार होते. वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर अजित पवार हे मंचावर आले. तेव्हा त्यांनी आसन व्यवस्थेत बदलाची सूचना केली. त्यांच्या नावाची पाटी दोन खुर्च्या सोडून लागली.

माध्यमांशी बोलताना अजितदादांनी या घडामोडीविषयी प्रतिक्रिया दिली. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना शरद पवार यांच्याशी बोलायचे होते. मी शरद पवार यांच्याशी केव्हाही बोलू शकतो. त्यामुळे बाबासाहेबांना त्याठिकाणी बसवलं. माझा आवाज इतका आहे की, दोन खुर्च्या सोडून तिसऱ्याला सुद्धा माझा आवाज जाईल, असे अजित पवार म्हणाले.

मग बंद दाराआड गुप्तगू
दोन्ही नेते हे जवळ बसले नसले तरी एकाच मंचावर होते. कार्यक्रमानंतर अजितदादा आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्याविषयी माध्यमांनी त्यांना विचारलं. या व्यवसायाच्या (शुगर) करता जे महत्वाचे प्रश्न आहेत. त्याविषयी पवारांशी बोलणे झाल्याचे ते म्हणाले. सहकार खातं, एक्साईज खातं, कृषी खातं आणि ऊर्जा खातं या चौघांचा या उद्योगाशी थेट संबंध येतो. त्याविषयावर चर्चा झाल्याचे अजितदादांनी सांगितलं.

कृषी खात्यातील भ्रष्टाचाराला लगाम घालणार
सध्या विविध गैरप्रकार, गैरव्यवहार आणि घोटाळ्यांमुळे कृषी विभाग गाजत आहे. याविषयी अजित पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले. कृषीचा आढावा मी घेतला, काही प्रवृत्ती विकृत असते जी गैरफायदा घ्यायला बघत आहे. या क्षेत्रात पारदर्शकता कशी आणता येईल याबद्दल आम्ही लक्ष घालत आहे. मुख्यमंत्री आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरसेवकांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला! दोन दिग्गज नेते प्रवेश करणार

20-25 आजी-माजी नगरसेवक करणार शिंदे गटात प्रवेश | पदाधिकाऱ्यांचाही समावेश दोन दिग्गज नेते अन आजी-माजी...

ट्रॉफिकच्या हप्तेखोर बोरसेंना दोन दिवसात हाकला!; नगर शहरवासीयांच्या भावनांची आ. संग्राम जगताप यांच्याकडून दखल

‌‘नगर सह्याद्री‌’चा इम्पॅक्ट | आ. जगताप यांनी एसपींना दिला अल्टीमेटम। खातेनिहाय चौकशी करण्याची गृहमंत्र्यांकडे...

मंत्री विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान; म्हणाले हा सन्मान…

लोणी / नगर सह्याद्री आधुनिक कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या नावाने स्थापन झालेल्या...

नगरमध्ये अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलन; १०० कलावंतांची ‘नांदी’, १०० कलावंतांचा ‘नृत्याविष्कार’

अहिल्यानगर। नगर सहयाद्री: - नगरमध्ये दि.२६ व २७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित अखिल भारतीय विभागीय...