spot_img
अहमदनगरSharad Pawar Ahmednagar News : मी महाराष्ट्रासाठी काय केले हे सगळ्यांना माहित,...

Sharad Pawar Ahmednagar News : मी महाराष्ट्रासाठी काय केले हे सगळ्यांना माहित, आपण १० वर्षात काय केले?; घोटाळेबाजांना सोबत घेऊन हिंडण्याची वेळ…

spot_img

खा. शरद पवार यांचा पत्रकार परिषदेत भाजपावर प्रतिहल्ला
अहमदनगर | नगर सह्याद्री
Sharad Pawar Ahmednagar News : शरद पवारांनी महाराष्ट्रात काय केले हे विचारण्यापेक्षा आपण २०११ ते २०२४ या काळात दहा वर्षा राज्यात नेमकं काय केलं असा प्रतिप्रश्न करत राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी भाजपावर हल्ला चढविला. त्यांच्याआधी १० वर्षं मी सत्तेत होतो, तेव्हा माझ्या काळात शेतीचे काय काम झाले, हे सगळ्या जगाला माहिती आहे, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टोला लगावला.

शनिवारी अहमदनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत खा. शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आहे. भाजपाने जो काही ४०० पारचा नारा केलेला आहे. तो चुकीचा वाटतो. त्यांनी जर सर्वच्या सर्व जागा जिंकू, असे म्हटले असते तर मान्य ही केले असते. महाराष्ट्रात सिंचन घोटाळा झाला हे मोदींनी भाषणातून अनेक वेळा सांगितले  परंतु हा घोटाळा कोणी केला. ते त्यांनी अजून स्पष्ट केलेले नाही. त्यांनी ते स्पष्ट करावे. ते ज्यांच्याबाबत बोलत आहेत. त्यांनाच घेऊन मोदी महाराष्ट्रभर फिरत आहेत, अशी ही टीका पवार यांनी केली.

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पाणी आणि चार्‍याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. मात्र याबाबत सरकारने कुठलेही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. अहमदनगर लोकसभेची निवडणूक ही पवार विरुद्ध विखे, अशी नाही कारण माझा इथून काही उमेदवारी अर्ज नाही. आमदार निलेश लंके हे आमच्याकडून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या विरोधात कोण आहे आणि ते काय बोलतात, यावर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही, असे शरद पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेस आमदार निलेश लंके, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके आदी उपस्थित होते.

आमचे लक्ष विधानसभेवर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यावेळी लोकसभेच्या १० जागा लढवत आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पाहाता १० जागा कमी असल्याचे बोलले जात होते. मात्र, आमचे लक्ष्य विधानसभा निवडणुकांवर असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी नगर जिल्ह्यातील राजकारणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी विखे पाटलांना टोला लगावला आहे.

धनगर आरक्षणाबाबत भाजपाने फसवणूक केली
पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येऊन सांगितलेले होते. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री झाले. मात्र गेल्या दहा वर्षात धनगर आरक्षणाचा कोणताही निर्णय भाजपा सरकारने घेतला नाही. आरक्षणाबाबत धनगर समाजाची भाजपाने फसवणूक केली आहे असे खा. शरद पवार म्हणाले.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

परप्रांतीय तरुणाचे भयंकर कृत्य! भर बाजार पेठेत अल्पवयीन मुलीसोबत घडलं असं काही..

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील भर बाजार पेठेतून एका 8 वर्षीय अल्पवयीन मुलीचे...

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींसाठी खास दिवस; तुमच्या राशींत काय?

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी...

प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती ; शिक्षक नेते संजय धामणे यांचे संचालक मंडळावर गंभीर आरोप

अहमदनगर / नगर सह्याद्री - प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती, सॉफ्टवेअर खरेदीसह जाहिराती व संचालक...

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...