spot_img
अहमदनगरकन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचे निधन

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचे निधन

spot_img

निघोज / नगर सह्याद्री :
कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष तसेच श्री.स्वामी समर्थ सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष शांताराम मामा लंके यांचे आज पहाटे (दि.४) रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी ऋदयविकाराच्या तिव्र धक्याने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज शनिवार रोजी दि.४ जानेवारी दुपारी तीन वाजता निघोज येथील स्मशानभूमीत होणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, भाऊ, भावजयी, पुतणे, सुना, नातू नाती असा मोठा परिवार आहे. कन्हैया दूध उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्रशेठ लंके यांचे वडील तसेच जी एस महानगर बॅंकेचे संचालक बबनशेठ लंके यांचे ते मोठे बंधू होत. गेली पंचवीस वर्षांपूर्वी लंके मामा यांनी कन्हैया दूध उद्योग समूहाची उभारणी केली. पंचवीस हजार लीटर संकलन ते आजपर्यंत लाखो लीटर प्रतिदिन संकलन करीत त्यांनी या उद्योग समूहाचा नावलौकिक देश परदेशात केला.‌ अत्यंत साधी राहाणी असणारे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून लंके मामा परिचीत होते. गेली पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी शेती क्षेत्रात कार्यरत राहून एक प्रगतीशील शेतकरी होण्याचा मान मिळवला. त्यानंतर दूध उत्पादक म्हणून त्यांचा गायी म्हशीचा गोठा प्रसिद्ध होता. पन्नास ते शंभर लिटर दूध दररोज डेअरीला घेऊन जायचे आणी दिवसभर शेतीत काबाडकष्ट करीत त्यांनी कुटुंबासाठी योगदान दिले.

मात्र आपण शेतकऱ्यांसाठी काही तरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी कन्हैयाची स्थापना केली. या दूध व्यवसाय माध्यमातून आज देशपरदेशात दूधावर प्रक्रिया करीत चिझ, पणीर, आईस्क्रीम श्रीखंड असे विविध पदार्थ मोठ्या प्रमाणात देशपरदेशात जात आहे.‌ तसेच कन्हैयाचे पाणी बॉटल सुद्धा राज्यात जात असून राज्यातील लाखो कामगारांना व व्यवसायीकांना हक्काचा रोजगार आज कन्हैया माध्यमातून मिळाला आहे.

मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी गेली वीस वर्षात महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. लंके मामा यांचे गाव विकासासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात ते सातत्याने कार्यरत होते. गोरगरीब समाजाला साथ देणारे लंके मामा यांच्या निधनामुळे फार मोठी उणीव जाणवणार आहे. दूध व्यवसायातील शेतकऱ्यांना पाठबळ देणारा एक अनभिषिक्त सम्राट हरपला असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. शांताराम मामा लंके यांना नगर सह्याद्री परिवार यांजकडून भावपूर्ण श्रद्धांजली.

निघोज गावात पाळला बंद

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आज निघोज गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी दुर्घटना! विद्यार्थ्यांनी भरलेली स्कुल बस घाटात पलटली; ३५ विद्यार्थी…

संगमनेर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुयात शाळेच्या बसला अपघात झाला आहे. पुणे...

राज ठाकरेंच्या घातपाताचा प्लॅन: ‘बड्या’ नेत्याचा खळबळजनक आरोप

मुंबई। नगर सहयाद्री: महाराष्ट्राच्या राजकारणात आता राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच...

आमदार काशीनाथ दाते यांच्या प्रयत्नांना यश; पारनेरची जलक्रांती निर्णायक वळणावर

पारनेर । नगर सहयाद्री:- तालुयातील जलसंपत्ती विकासाला चालना देण्यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या...

सुसाट टेम्पोने उडविल्या १० दुचाकी, अहिल्यानगर शहरातील दुर्घटना कशी घडली?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १०...