spot_img
अहमदनगरशांताराम लंके यांचे सामाजिक कार्य मोठे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य मोठे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

spot_img

निघोज / नगर सह्याद्री :
कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष व श्री.स्वामी समर्थ सहकारी बँकेचे उपाध्यक्ष शांताराम लंके यांचे शनिवार दि.४ रोजी निधन झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज रविवार दि. १२ रोजी कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या पत्नी झुंबरबाई लंके, कन्हैया दूध उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्रशेठ लंके, जी एस महानगर बॅंकेचे संचालक बबनशेठ लंके व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कन्हैया ॲग्रोचे संचालक सुरेशशेठ पठारे, माजी सरपंच ठकारामशेठ लंके, राळेगण सिद्धीचे सरपंच लाभेश औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव थोरात, जवळ्याचे माजी सरपंच सुभाष आढाव, जी एस महानगर बॅंकेचे अधिकारी लामखडे साहेब, मुंबई येथील व्यवसायीक राजूशेठ वराळ , पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, शहराध्यक्ष योगेश खाडे, प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल, वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ, रुपेश ढवण आदी उपस्थित होते.

हजारे यावेळी म्हणाले शांताराम लंके यांनी कन्हैया माध्यमातून मोठे विश्व‌उद्योग निर्माण केले मात्र याचा फायदा सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला मिळाला पाहिजे हा त्यांचा उद्देश होता. गेली साठ वर्षे त्यांनी समाजाभिमुख काम केले. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे यासाठी त्यांनी आधुनिक शेती केली तसेच शेतकऱ्यांना दूधाच्या माध्यमातून चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी कन्हैया दूध उद्योग समूहाची उभारणी केली. या भागात जी एस महानगर बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके, निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे मार्गदर्शक बाबासाहेब कवाद, कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके हे एकाच विचाराने प्रभावित झालेली माणसं आहेत. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले आहे. लंके यांनी हा कन्हैया दूध उद्योग समूह सातासमुद्रापार नेला आहे. त्यांचे बंधू बबनशेठ लंके, चिरंजीव मच्छिंद्रशेठ लंके यांनी त्यांना साथ देत उद्योग समूहाच्या माध्यमातून अतिशय चांगले काम केले आहे. शांताराम लंके हे सातत्याने राळेगण सिद्धी येथे येऊन विविध प्रश्नांवर चर्चा करीत असत. सामाजिक विचारांची बैठक असणारे या भागातील एक निस्पृह कार्यकर्ते म्हणून त्यांचा नावलौकिक राज्यात झाला आहे. कन्हैया दूध उद्योग समूह देशात मोठा आहे त्याची जबाबदारी यापुढे मच्छिंद्रशेठ लंके यांची असून त्यांनी शांताराम लंके यांचे सामाजिक विचार यापुढे जतन करुण सर्वसामान्य जनतेच्या कल्याणार्थ शांताराम लंके यांचे अनुकरण करीत काम करण्याचे आवाहन हजारे यांनी केले आहे. यावेळी निघोज परिसरातील पुष्पावती नदिकिनारी होत असलेल्या ऑक्सिजन पार्क येथे कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हजारे यांच्या हस्ते पिंपळाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.

गेली न‌उ दिवसात राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यवसायीक पुणे, मुंबई, तसेच विविध भागांतून मोठ्या संख्येने आलेल्या लोकांनी कन्हैया दूध उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्रशेठ लंके यांना भेटून सांत्वन केले आहे. सोमवार दि.१३ रोजी निघोज येथील पुष्पावती नदिकिनारी कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचा दशक्रिया विधी असून सामूहीक श्रद्धांजलीचे आयोजन करण्यात आले आहे.


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणी कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांच्या कायम गाठीभेटी होत असत. कन्हैया अखंड हरिनाम सप्ताहात हजारे हे दरवर्षी येऊन भेटत असत. तसेच शांताराम लंके यांची नात व मच्छिंद्रशेठ लंके यांची मुलीच्या लग्नात हजारे हे तीन तासांपेक्षा जास्त वेळ उपस्थित होते. नुकतेच शिरूर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये लंके यांच्यावर उपचार सुरू होते. त्यावेळीही हजारे हे बराच वेळ हॉस्पिटलमध्ये लंके यांना भेटले. भरपूर गप्पा मारल्या या आठवणी काढीत हजारे यांना यावेळी गहीवरुन आले. त्यांना ईश्वराने लवकर बोलावले असे म्हणत त्यांना अश्रु अनावर झाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये दोन गटात राडा; मकर संक्रांतीच्या दिवशी नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- मकरसंक्रांतीच्या दिवशी गाणे वाजवण्यावरून व पतंग उडविण्याच्या वादातून निलक्रांती चौक परिसरात...

..अन् नायलॉन मांजाने आयुष्याचा दोर कापला, राज्यात ‘ईतक्या’ जणांचा मृत्यू

Maharashtra News: मकर संक्रांतीच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे राज्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर...

हवामान विभागाची महत्वाची अपडेट; थंडी गायब? ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Weather Update: राज्यामध्ये थंडी गायब झाली असून पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे...

विखे परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक : सौ. शालिनीताई विखे पाटील

  अळकुटी महाविद्यालयात लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध स्पर्धा उत्साहात निघोज...