अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शनी शिंगणापूर देवस्थानचे कार्यालय जिल्हा प्रशासनाकडून सील करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पोलीस बंदोबस्तात हे कार्यालय सील केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय कार्यालय सिल केल्याने मंदिर परिसर आणि विश्वस्त मंडळात खळबळ उडाली आहे. शनि शिंगणापूर देवस्थानवरील विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर येथे कागदपत्रांची हेराफेरी केली जात असल्याची बाब समोर आली होती. शनि शिंगणापूर देवस्थानवरील विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर येथे कागदपत्रांची हेराफेरी केली जात असल्याची बाब समोर आली होती.
येथील विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचारासह अनेक आरोप करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ हे कार्यालय सील केले आहे. येथील विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचारासह अनेक आरोप करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ हे कार्यालय सील केले आहे. विश्वस्त मंडळातील सदस्यांकडून मंदिर देवस्थान ट्रस्टसंदर्भातील भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट केले जाऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची कारवाई केली.
शनि शिंगणापूर देवस्थान कार्यालय सील करताना येथील कार्यकारी अधिकारी मात्र गैरहजर असल्याचे पाहायला मिळालं. पोलीस बंदोबस्त आणि सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय कार्यालय सील करण्यात आले आहे. त्यामुळे, आता येथील मंदिर समितीचा संपूर्ण कारभार शासनाकडे असणार आहे.