spot_img
अहमदनगरशेतकऱ्याला भरदिवसा लुटणाऱ्याला ठोकल्या बेड्या! 'असा' लावला होता सापळा

शेतकऱ्याला भरदिवसा लुटणाऱ्याला ठोकल्या बेड्या! ‘असा’ लावला होता सापळा

spot_img

जामखेड। नगर सहयाद्री:-
शेतकर्‍याने जामखेड येथे कांदा विकुन आलेल्या कांद्याच्या पट्टीचे पैसे आपल्या गावी घेऊन जात असतानाच जामखेड करमाळा रोडवरील चुंबळी फाट्याजवळ पाठीमागून दोन मोटारसायकलवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी शेतकर्‍याची मोटारसायकल आडवुन, मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. याप्रकणी पोलिसांनी आरोपींना ४८ तासांच्या आत अटक केली आहे. रस छगन भोसले व दीपक पवार, रा. आरोळे वस्ती, जामखेड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सोमवार दि १५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी विकास दत्तु मलंगणेर (वय ४५ वर्षे रा. नान्नज ) जामखेड येथील एका ट्रेडर्सच्या दुकानात कांद्याचे पट्टीचे पैसै आनण्यासाठी येथे गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे जोडीदार अशोक महादेव मोहळकर हे देखील होते. मलंगणेर यांनी कांद्याच्या पट्टीचे १ लाख ६० हजार रुपये घेऊन शर्टच्या आतील भागात ठेऊन ते जोडीदारा सोबत मागे मोटारसायकलवर बसुन आपल्या नान्नज गावी चालले होते.

दरम्यान पाळत ठेऊन आसलेल्या चौघा अज्ञात चोरटय़ांनी शेतकर्‍यांचा पाठलाग सुरू करत जामखेड करमाळा रोडवरील चुंबळी फाट्याच्यावर मोटारसायकल अडवली लावून मारहाण करत शर्टाच्या आत मध्ये ठेवलेले १ लाख ६० हजार रुपये व ४ हजार रुपये किमतीचा १ लाख ६४०० हजार रुपयांचा ऐवज लुटणाऱ्याचा प्रकार घडला होता.

गुन्हा घडल्यापासून पारस छगन भोसले व दीपक पवार, हे दोन्ही आरोपी दोन दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. पो. नि. महेश पाटील यांच्या पथकाने आरोपींचा कसून शोध घेतला. हे आरोपी जामखेड शिवारातील आयटीआयजवळील काळेवाडी तलाव परिसरातील म्हसोबा मंदिराच्या परिसरात असल्याची माहिती मिळताच पोहेकॉ. इंगळे, पोना. संतोष कोपनर, पोना. जितेंद्र सरोदे, पो. अंमलदार देवा पळसे, यांनी आपल्या जीवाची बाजी लावून आरोपींचा पाठलाग करून आरोपींना जेरबंद केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...