अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. गावांनी केलेल्या मागणीनुसार तब्बल सव्वा सहा लाख नागरिकांना ३४५ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान टँकरचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असून जिल्ह्यातील पाणीसाठी २० टक्क्यांच्या खाली आला आहे. वेळेत पाऊस न झाल्यास पाणी कपातीचे संकट नगरकरांवर ओढवू शकते.
सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राहाता तालुयात देखील टँकर सुरू झाला आहे. श्रीरामपूर व राहुरी वगळता १२ तालुयांतील ६ लाख ३९ हजार १७५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाथर्डी तालुयात सर्वाधिक १०५ टँकर सुरू आहेत.दर वर्षी एप्रिल व मे महिन्यात संगमनेर, नगर, पारनेर व पाथर्डी तालुयांतील काही गावांना पाणीटंचाई परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढलेली दिसत आहेत. आजमितीस श्रीरामपूर व राहुरी तालुके वगळता सर्वचतालुयांत कमी अधिक प्रमाणात टँकर सुरू आहेत.
पाथर्डी तालुयातील ८७ गावे आणि ४५५ वाड्यांत पाणी परिस्थिती गंभीर आहे. त्याखालोगाल पारनेर, कर्जत, संगमनेर तालुयात पाणीटंचाई तीव्र आहे. पावसाळा लांबल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक वाढण्याची शयता आहे. सध्या पाथर्डी, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा व शेवगाव या नगरपालिका व नगरपंचायतींना देखील पाणीटंचाईचे चटके बसले आहेत. कर्जत नगरपालिकेत ११ तर पाथर्डी नगरपालिका क्षेत्रात ६ टैंकर धावत आहेत. या पाच नगरपालिका क्षेत्रांसह जिल्ह्यातील ३३३ गावे आणि १ हजार ७६९ वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे या गावांतील ६ लाख ३९ हजार १७५ लोकसंख्येला ३४५ टँकरद्वारे
पाणीपुरवठा सुरू आहे. तालुकानिहाय टँकर संख्या
संगमनेर: २८, अकोले ६, कोपरगाव ७, नेवासा ५, राहाता १, नगर ३३, पारनेर ३९, पाथर्डी १११, शेवगाव १७, कर्जत ५२, जामखेड २६, श्रीगोंदा २०.