spot_img
ब्रेकिंगमनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू?: कर्मचारी युनियनच्या वतीने आ. जगताप यांचा...

मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू?: कर्मचारी युनियनच्या वतीने आ. जगताप यांचा सत्कार

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो मंजूर व्हावा यासाठी मनपा कर्मचारी युनियनचे पदाधिकारी सलग नऊ दिवस उपोषणास बसले होते, राज्य सरकारने सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी आ. संग्राम जगताप यांनी पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मंजूर झाला असून आदेशाचे पत्र आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आज पदाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्यात आला.

यावेळी युनियनच्या वतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल,जितेंद्र सारसर, सचिव आनंदराव वायकर . बाबासाहेब राशीनकर ,नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड़ , सागर सालुंके, अजय सौदे, प्रफुल लोंढे,अजित तारु, अंतवन क्षेत्रे , विजय कोतकर, बाळासाहेब व्यापारी, अनंत लोखंडे, भास्कर अकूबत्तीन,अकील सय्यद, सखाराम पवार, महादेव कोतकर,अमोल लहारे, दिपक मोहिते, आर. ए. देशमुख आदी उपस्थित होते

अहमदनगर महानगरपालिकेमध्ये कमी वयामध्ये नगरसेवक महापौर पदावर काम करण्याची संधी मिळाली आणि अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याची हातोटी आली त्यामुळेच मी आमदारकीच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासाला चालला देऊ शकलो, मनपा कर्मचारी यांनी नेहमीच संकट काळामध्ये नगरकरांचे प्रश्न मार्गी लावले आहे, त्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावावा हे माझे कर्तव्य होते आणि ते मी पूर्ण करू शकलो याचा मला मनस्वी आनंद आहे असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले,

आ. जगताप यांच्यामुळे अनेक वर्षाच्या पाठपुराव्याला यश
मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आ. संग्राम जगताप यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असल्यामुळे तो मंजूर झाला आहे, त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल अनेक वर्षाच्या पाठपुराव्याला आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे यश आले असल्याचे मत युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी व्यक्त केले.

लवकरात लवकर सातवा वेतन आयोग..
राज्य सरकारने अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मंजूर केला असून सुधारित वेतन श्रेणी दि. १ जानेवारी२०१६ पासून लागू करण्यास व प्रत्यक्ष वेतन दि. १ सप्टेबर २०१९ पासून देण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. तरी लवकरात लवकर मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करून पगार दिले जातील असे मत आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“काकाचं दर्शन घे, थोडक्यात वाचलास….”; अजित पवारांचा रोहित पवारांना टोला

मुंबई / नगर सह्याद्री - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे....

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले की…

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग...

नुसती विधानपरिषद नको, तर कॅबिनेट मंत्रीपदच हवं; लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय झाला. महाविकास आघाडीचा राज्यात सुपडासाफ...

पारनेरकरांना खुशखबर! मंत्री विखे पाटील म्हणाले, पुढील काळात..

आ. काशिनाथ दाते यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची घेतली भेट पारनेर | नगर सह्याद्री पारनेर...