10 तोळ्याचे गंठणही चोरले । तोफखान्यात गुन्हा
अहिल्यानगर । नगर सह्याद्री
मुलाला वाचवायचे असेल तर अडीच लाख रुपये द्यावे लागतील अशी धमकी देत नोकराकडून आजीला खंडणीची मागणी करण्यात आली. तसेच 10 तोळ्याचे गंठण चोरुन नेल्याप्रकरणी नोकर राजू पाटोळे (रा. धवन वस्ती, सावेडी) आणि त्यांच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध खंडणी व आणि चोरीचा गुन्हा तोखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वैभव अजय बोरुडे (वय- 30, रा. बोरुडे ळा, बालिकाश्र रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सविस्तर हकिगत अशी की राजू याने वैभव यांच्या आजी कलावती बोरुडे यांना धकावून अडीच लाख रुपये खंडणीची मागणी केली. आणि 1.5 लाख रुपये कितीचे 10 तोळे सोन्याचे गंठण चोरल्याचा आरोप आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये कलावती यांचे घरातील सोन्याचे गंठण चोरीला गेले. त्यावेळी राजू प्रियदर्शन हॉटेल आणि घरात साफसफाईचे काम करत होता. चोरीनंतर तो काम सोडून पसार झाला. 17 जुलै 2025 पासून त्याने पुन्हा काम सुरू केले आणि कलावती यांना फोनवर धमकावण्यास सुरुवात केली. त्याने वैभव यांचा चुलता संजय याच्यावर अडीच लाखांचे कर्ज असल्याचे सांगून खंडणी मागितली. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर आजीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संजय यांच्यावर अडीच लाखाचे कर्ज असल्याने राजूने आजीला सांगितले होते. तसेच पैसे न दिल्यास संजयला मारहाण करणार असल्याचेही सांगितले होते. प्रकरण मिटवायचे असेल तर अडीच लाख रुपये द्यावे लागतील असे राजू आजीला म्हणाला होता. आजीच्या मोबाईलवरील राजूचे संभाषण ऐकल्यानंतर 25 जुलै 2025 रोजी राजू व त्यांच्या साथीदारावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक आनंद कोकरे आणि तपासी अधिकारी पोसई योगेश चाहेर पुढील तपास करत आहेत.