spot_img
ब्रेकिंगबाळासाहेब थोरात यांचा पराभव 'धक्कादायक'; निवडणूक आयोगावर काँग्रेसचे गंभीर आरोप

बाळासाहेब थोरात यांचा पराभव ‘धक्कादायक’; निवडणूक आयोगावर काँग्रेसचे गंभीर आरोप

spot_img
 अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसते. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा महायुतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूवच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते. महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. अवघ्या सहाच महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. निवडणूक आयोगाने आपल्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे. 
अहिल्यानगर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निवडणूक आयोगाच्या कारभारावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले. त्याबाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. याबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत जोशी यांनी माहिती दिली. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ज्येष्ठ नेते घन:श्याम शेलार, अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माथाडी काँग्रेस विभाग अध्यक्ष विलास उबाळे, मागासवगय विभाग प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे, अल्पसंख्याक प्रदेश पदाधिकारी निजाम जहागिरदार, महिला काँग्रेस उपाध्यक्ष आशाताई लांडे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले की, निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. राज्यघटनेने आयोगाला मोठे अधिकार दिलेले आहेत. देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी आयोगाची आहे. निवडणुकीत मतदार हा राजा असतो. परंतु मागील काही वर्षातील आयोगाची भूमिका पक्षपाती दिसत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहाच महिन्याच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली ? यामागील सत्य जनतेसमोर आले पाहिजे. संध्याकाळी पाचनंतर 76 लाख मतदान वाढलेले दाखवले आहे.
बाळासाहेब थोरात यांचा पराभव धक्कादायक 
मागील सलग 40 वर्ष बाळासाहेब थोरात हे राज्याच्या विधानसभेत जनतेच्या भरघोस पाठिंब्याने निवडून जात होते. त्यांची सतत सर्वसामान्य माणसाशी असणारी बांधिलकी, संवाद, थेट संपर्क अत्यंत मजबूत होता. अनेक वर्ष राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी काम केले. त्या माध्यमातून आपल्या मतदारसंघांमध्ये भरघोस निधी आणत विकास कामांचा डोंगर त्यांनी उभा केला होता. असे असतानाही त्यांचा पराभव हा धक्कादायक आणि अविश्वसनीय आहे. अजूनही संगमनेर विधानसभा मतदारसंघासह राज्याला थोरात यांचा पराभव हे न उलगडलेले कोडे असल्याचे यावेळी माजी आमदार मोहन जोशी म्हणाले. एक प्रकारे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी निवडणुक प्रक्रियेतील पारदर्शकते बद्दल संशय यावेळी व्यक्त केला. 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

भाजप-राष्ट्रवादीचं ठरलं!, महापालिका निवडणुकीत युती; एमआयएमही उतरणार मैदानात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आता...

नेपाळमध्ये राडा! आंदोलकांनी संसद पेटवली, पंतप्रधानांचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - नेपाळमधील परिस्थिती सतत बिकट होत चालली आहे. निदर्शनांनी हिंसक...

चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे शुक्रवारी भूमिपूजन; आमदार कर्डिले यांची माहिती, कोण कोण राहणार उपस्थिती?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपबाजार समितीचे भूमिपूजन येत्या शुक्रवार दिनांक 12...

विसर्जन मिरवणुकीत युवकाचा खून; कुठे घडली घटना?

सांगली । नगर सहयाद्री:- मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांमध्ये सुरू...